पुणो : शहरात आज दिवसभरात डेंगीचे 26 नवे रुग्ण सापडले. या नव्या रुग्णांमुळे या महिन्यातील डेंगीच्या रुग्णांची संख्या 498 वर पोहोचली आहे. यावरून डेंगीने शहराला विळखा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, डेंगीसदृश तापाच्या रुग्णांनी शहरातील रुग्णालये भरू लागली आहेत.
महिनाभरापासून शहरात डासांनी हैदोस मांडलेला असतानाही, पालिकेकडून कोणत्याही विशेष उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वेगाने होऊ लागली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागसह उपनगरांमध्येही डासांचे प्रमाण खूप वाढले आहे.
यामुळे डेंगीसदृश तापाने फणलेल्या रुग्णांची रुग्णालय व दवाखान्यांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. या वर्षात शहरात डेंगीचे तब्बल 888 रुग्ण सापडले आहेत. यातील काहींना जीवही गमवावा लागला आहे. डेंगीपासून वाचण्यासाठी डासांची पैदास होणारी ठिकाणो निकामी करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. डेंगीच्या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते. पावसाळा सुरू असल्याने कुंडींमध्ये, बुटांमध्ये, फ्रिजच्या मागच्या डब्ब्यामध्ये, करवंटीमध्ये, टायरमध्ये पाणी साठून त्यात डासांची पैदास होण्याचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)