शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दुतर्फा पार्किंगमुळे धोका , दुतर्फा पार्किंगमुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:10 IST

रुंदीकरण झालेल्या मार्गावरील काही प्रमुख रस्त्यावर क्रांतिसूर्य महात्मा फुले (तीन हत्ती) चौकातील बेकायदेशीर पार्किंगवर होत असलेली वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावल्याने तळजाईकडे जाणाºया प्रशस्त डीपी रस्त्यावर वाहने लावण्यास सुरुवात केल्यामुळे हा डीपी रस्ता अपघात चक्रात अडकण्याच्या मार्गावर आहे. 

धनकवडी : रुंदीकरण झालेल्या मार्गावरील काही प्रमुख रस्त्यावर क्रांतिसूर्य महात्मा फुले (तीन हत्ती) चौकातील बेकायदेशीर पार्किंगवर होत असलेली वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावल्याने तळजाईकडे जाणाºया प्रशस्त डीपी रस्त्यावर वाहने लावण्यास सुरुवात केल्यामुळे हा डीपी रस्ता अपघात चक्रात अडकण्याच्या मार्गावर आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले (तीन हत्ती) चौक, संभाजीनगर, कानिफनाथ चौक ते त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ परिसर विस्तारीत रस्ता, धनकवडी रस्ता या मार्गाकडेला सातत्याने होणारे बेकायदा पार्किंग, पर्यायाने होणारी वाहतूककोंडी, धोकादायक स्थिती आणि अपघात याबाबत नागरिकांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांपर्यंत पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलिसांनी बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता जॅमर लावून अनेक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली होती.याबाबत स्थानिक नागरिकांनी  बेकायदा पार्किंग, बेवारस वाहने त्यामुळे होणारे अपघात आणि वाहतूककोंडी या समस्यांचा पाढा वाहतूक शाखेच्या उपायुक्तांसमोर वाचला होता. परंतु कारवाई थंडावल्याने पुन्हा वाहनचालकांनी डीपी रस्त्याकडे आपला मोर्चा वळवला.धनकवडी स्मशानभूमी ते तळजाई शेवटचा बसथांबा या अर्धा किमीच्या अंतरावर दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट बस, स्कूल व्हॅन, ट्रक, टेम्पो, मोटारी यांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. दुतर्फा पार्किंगमुळे ६० फुटी रस्ता आकसला जाऊन केवळ १५-२० फुटच रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहिला आहे. पादचाºयांनासुद्धा या वाहतुकीतून  धोकादायक पद्धतीने मार्गस्थ व्हावे लागत आहे. या मार्गावरील महापालिकेच्या शाळेत जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.धोकादायक स्थितीचा सामनाकिती दिवस हा त्रास आम्ही सहन करायचा ज्येष्ठ नागरिक, पादचारी, महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांना सातत्याने धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा होणाºया बेकायदा पार्किंगमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भानुदास पायगुडे यांनी दिला.

 

टॅग्स :Puneपुणे