शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांचा वाढतोय धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:33 IST

गेल्या काही वर्षांत शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर प्रचंड हैराण झाले आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्या, रात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या नागरिकांवर ही भटकी कुत्री हल्ला करीत आहेत.

पुणे : गेल्या काही वर्षांत शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर प्रचंड हैराण झाले आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्या, रात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या नागरिकांवर ही भटकी कुत्री हल्ला करीत आहेत. यामध्ये सध्या महिन्याला सरासरी तब्बल ९०० ते एक हजार पुणेकरांना भटकी कुत्री चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले कमला नेहरू उद्यानाच्या परिसरात सकाळी फिरायला गेल्या असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा शहरातील भटक्या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या वतीने सन २००७मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४० हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते.आता ही संख्या तब्बल २ लाखांच्या घरात गेली असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे. शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावरटाकाला जाणार कचरा,या भटक्या कुत्र्यांवर प्रेमकरून त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.>कायद्यानुसार अनेक अडचणीकेंद्र शासनाने पाळीव प्राणी कायदा केला आहे. या कायद्यामुळे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणताना अनेक अडचणी येतात. यामध्ये स्तनपान करणारी मादी व पिलांना उचलणे, सहा महिन्यांपेक्षा लहान पिलांना उचलणे, नसबंदी झालेल्या कुत्र्यांना पुन्हा उचलणे, कुत्र्यांना एका जागेवरून दुसरीकडे सोडण्यास बंदी, शहराच्या वेशीबाहेर नेण्यास बंदी आहे. यामुळे नसबंदी करताना व अन्य उपाययोजना करताना अनेक अडचणी येतात.> शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे; परंतु अनेक वर्षे भटक्या कुत्र्यांची गणनाच झालेली नाही. यामुळे उपाययोजना करताना बंधने येतात. यामुळे आता पुन्हा एकदा लवकच शहरातील कुत्र्यांची गणना करण्यात येणार आहे. तसेच, सध्या दिवसाला सरासरी ७० कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया केली जात असून, ही संख्या ११५ पर्यंत वाढविण्यात येईल.- डॉ. अंजली साबणे, उपआरोग्य प्रमुख