शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाले नामा गावात ‘माळीण’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:38 IST

नाणे मावळातील पाले नामा या गावाच्या वरच्या भागावर डोंगराचा भाग काही दिवसांपासून खचत चालला आहे.

कामशेत : नाणे मावळातील पाले नामा या गावाच्या वरच्या भागावर डोंगराचा भाग काही दिवसांपासून खचत चालला आहे. याठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. डोंगराचा हा भाग ढासळण्याच्या स्थितीत असून, नाणे मावळातील या गावाचेही माळीण होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीत असलेल्या पाले नामा या गावाच्या वरील बाजूला डोंगराची मोठी रांग आहे. या डोंगराच्या पायथ्याच्या एका बाजूला पाले नामा हे ४४२ लोकसंख्येचे गाव आहे. खालच्या बाजूला जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा असून, या शाळेत गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेजवळ काही घरेही आहेत. दुर्गम गावाच्या दुसºया बाजूला वडिवळे धरण परिसर असल्याने या भागात पावसाचे प्रमाण खूप असते.गावच्या वरच्या भागातील डोंगराचा मोठा भाग मागील काही दिवसांपासून खचत चालला आहे. डोंगराच्या सपाट भागाला मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी भेगा पडल्या असल्याने हा भाग कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती वर्तवली जात आहे.>तहसीलदार : वेळीच कार्यवाहीच्या सूचनाडोंगराचा काही भाग खचला आहे, याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाला दिली आहे. डोंगराच्या खालच्या बाजूला शाळा व काही घरे असल्याने त्यांना धोका निर्माण होऊन माळीणसारखी परिस्थिती होऊ शकते म्हणून वेळीच उपाययोजना करण गरजेचे आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिल्या आहेत.>बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडून पाहणीजिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पाटील व शिंदे हे सोमवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता सुभाष क्षीरसागर यांनी दिली. येत्या दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.>पाले नामा गावाच्या वरील डोंगराच्या भागात भेगा पडल्याने तसेचयाचा गाव व शाळा यांना धोका होऊ नये. या संबंधीचा सर्व्हे करण्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर उपाययोजना तातडीने करण्याची खबरदारी घेण्यात येणार आहे. - रणजित देसाई, तहसीलदार, मावळ