शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

दौैंडला वाढीव घरपट्टीवरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:00 IST

दौैंड : वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावरून दौैंड नगर परिषदेत गुरुवारी मोठा गदारोळ झाला. करमूल्यांकन निर्धारण अधिकारी शेंडे, टाऊन प्लॅनिंगचे दत्तात्रय काळे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांना शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले. साधारणत: तीन तासांच्यावर नगर परिषदेत हा गोंधळ सुरू होता.दौैंड नगर परिषद कार्यालयात वाढीव घरपट्टीसंदर्भात आज सुनावणी ठेवली ...

दौैंड : वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावरून दौैंड नगर परिषदेत गुरुवारी मोठा गदारोळ झाला. करमूल्यांकन निर्धारण अधिकारी शेंडे, टाऊन प्लॅनिंगचे दत्तात्रय काळे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांना शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले. साधारणत: तीन तासांच्यावर नगर परिषदेत हा गोंधळ सुरू होता.दौैंड नगर परिषद कार्यालयात वाढीव घरपट्टीसंदर्भात आज सुनावणी ठेवली होती. परंतु,वाढीव घरपट्टी ही सर्वसामान्यांना अन्यायकारक आहे, अशी भावना या वेळी सर्वांनीच मांडल्या. ज्या नागरिकांची घरे छोटी आहेत त्यांना जास्त घरपट्टी तर ज्यांची घरे मोठी आहेत त्यांना कमी घरपट्टी, असा सगळा सावळा गोंधळ आहे. चुकीच्या सर्वेक्षणामुळे हा गोंधळ होत असल्याने ती तातडीने कमी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.शिवसेना-भाजपा यांच्यासह सेवाभावी संस्थेनीही यापूर्वी वाढीव घरपट्टी कमी करण्याची मागणी केली होती.आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्र खटी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोर्चा काढला. आणि हा मोर्चा नगर परिषदेत कार्यालयात नेला. यावेळी तालुका प्रमुख अनिल सोनवणे, शहरप्रमुख संतोष जगताप, कैलास शहा, आनंद पळसे, अमोल जगताप, शैलेश पिले, प्रसाद कदम, गणेश दळवी, विक्रम इंगवले, अँथोनी निंबाळकर तसेच भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्ट मंडळाने उपस्थित अधिकाºयांना घरपट्टी वाढवल्याबाबात जाब विचारला. या वेळेस उपस्थित अधिकाºयांची तू तू-मै मै झाली. अधिकारी सभागृहातून निघून जायला लागले, त्यावेळेस सुनील शर्मा, भाजपाचे शहराध्यक्ष फिरोज खान, नासीर पटेल, सतपालसिंग वालिया, प्रकाश पारदासानी, रोहिणी खेडेकर यांनी सभागृहाचा दरवाजा लावून घेत अधिकाºयांना बाहेर जाण्यास मज्जाव केला. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांनी वाढीव घरपट्टीला विरोध केला. यावेळी नगर परिषदेच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणला होता.राष्ट्रवादीचे गटनेते बादशहा शेख म्हणाले, की वाढीव घरपट्टी ही जाचक असून यासाठी विशेष सभा बोलवून घरपट्टी कमी करण्याचा ठराव घेणार आहे. शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, शिवसेनेच्या नगरसेविका अनिता दळवी, राष्ट्रवादीचे नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांनी वाढीव घरपट्टीला विरोध करत घरपट्टी कमी झालीच पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा पवित्रा घेतला.यानंतर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्या सकारात्मक धोरणामुळे आक्रमक झालेले आंदोलक शांत झाले.वरिष्ठांचा निर्णय अंतिमवाढीव घरपट्टी कमी करणे, हे माझ्या हातात नाही. यासाठी नगर परिषदेत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाला पाहिजे. हा ठराव मंजूर झाल्यास मी ठरावाची प्रत जिल्हाधिकारी आणि नगर रचना विभागाला पाठवेन. त्यानंतर वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यानुसार घरपट्टी आकारली जाईल. -अ‍ॅड. विजयकुमार थोरात, मुख्याधिकारी, दौैंड

टॅग्स :Puneपुणे