शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांत दांडीबहाद्दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:12 IST

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीत दिवसेंदिवस घटत चालली आहे.

पुणे : कालबाह्य झालेले अभ्यासक्रम, प्राध्यापकांच्या अध्यापनाच्या जुन्या पद्धती, तोंडी परीक्षांसाठी सरसकट वाटले जाणारे गुण, खोटी उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांना दिली जाणारी सुट यासह अनेक कारणांमुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीत दिवसेंदिवस घटत चालली आहे. वर्ग सुरू, मात्र विद्यार्थीच नाहीत हे वास्तव पुण्यातील बहुतेक महाविद्यालयांत ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत अधिक आहे. त्यातही विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया पुणे शहरात राज्यभरातून व राज्याबाहेरून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच, स्पर्धा परीक्षांचे केंद्र अशीही एक ओळख पुण्याने निर्माण केली आहे. त्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयांसह मध्यम व सर्वसामान्य महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होते. प्रवेशक्षमता संपल्यामुळे महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून १० टक्के वाढीव विद्यार्थ्यांची मागणी केली आहे. शहरातील बहुतांश सर्वच महाविद्यालयांना वाढीव विद्यार्थी मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरापासून महाविद्यालयीन वर्ग सुरळीतपणे सुरू झाले आहेत; मात्र कला विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी वर्गात उपस्थित नाहीत. तसेच, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती काही प्रमाणात बरी असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.केवळ वर्गात बसून शिक्षण घेता येत नाही, तर वर्गाबाहेरही माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध विषयांचे ज्ञान मिळवता येत आहे. बुक्सच्या माध्यमातून आॅनलाइन अभ्यासक्रम शिकवले जात आहेत; तसेच अनेक विषयातील ज्ञान इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे प्राध्यापकांकडून वेगळे ज्ञान मिळण्याची विद्यार्थ्यांना अपेक्षा असते; मात्र विद्यार्थ्यांची अपेक्षा पूर्ती होत नाही. हेसुद्धा अनुपस्थितीचे प्रमाण वाढण्याचे एक कारण आहे.>पारंपरिक अभ्याक्रमांना आव्हानबारावी उत्तीर्ण झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे निश्चित केलेले नसते. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन केवळ पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला असल्याचे दिसून आले. प्राध्यापकांकडून चांगल्या पद्धतीने शिकवले जात नाही. कला शाखेच्या विषयांचा अभ्यास घरी बसून केला, तरीही सहज उत्तीर्ण होता येते. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची गरज असल्याने महाविद्यालयाकडून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना उत्तीर्णच केले जाते. त्यामुळे नियमितपणे वर्गात बसले नाही तरी चालते, अशा प्रतिक्रिया शहरातील काही नामांकित महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या.>विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती लावण्याचा प्रकार अनेक महाविद्यालयाकडून होत आहे. तसेच, कला अभ्यासक्रमांमध्ये वेळीच बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कॉलेजमध्ये न जाताही ७० टक्के गुण प्राप्त होतात, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार झाली आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्षाच्या तुकड्या ४ असतात; मात्र द्वितीय वर्षात त्या केवळ दोन होतात. द्वितीय व तृतीय वर्षाच्या 120 च्या तुकडीतील केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच विद्यार्थी वर्गात उपस्थितीत असल्याचे दिसून येते. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे.- प्रा. नंदकुमार निकम, शिक्षणतज्ज्ञ>महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे. मी स्वत: काही महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांशी व प्राध्यापकांशी चर्चा केली. त्यात प्राध्यापकांच्या अध्यापन पद्धतीबाबत काही विद्यार्थी नाराज असल्याचे दिसून आले. मात्र, वर्गात विद्यार्थीच बसले नाही, तर पुस्तकी ज्ञानाबरोबरच शिक्षकांकडील अनुभवातून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनाच्या लाभापासून सुद्धा हे विद्यार्थी मुकणार आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.- डॉ. प्र. चिं. शेजवलकर,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ