शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनी बससाठी दामिनी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:01 IST

पीएमपी महामंडळाचा निर्णय; चार वरिष्ठ महिलांचा समावेश

पुणे : खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी बस’मध्ये तिकीट तपासणीसाठी दामिनी पथक तयार करण्यात आले आहे. बसमध्ये तिकीट तपासणीसाठी गेलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना महिला प्रवाशांकडून सहकार्य केले जात नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) हा निर्णय घेतला आहे. या पथकामध्ये ‘पीएमपी’मधील चार वरिष्ठ महिला कर्मचारी असतील.जागतिक महिला दिनापासून ‘पीएमपी’ प्रशासनाने महिला विशेष बस सुरू केल्या आहेत. ‘तेजस्विनी’ नावाने सुरू असलेल्या बससेवेला महिला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकूण प्रवाशांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्याने ही बससेवा लोकप्रिय ठरली आहे. सध्या एकूण ९ मार्गांवर ३० हून अधिक मिडी बसमार्फत ही सेवा सुरू आहे. दररोज जवळपास दहा हजार महिला या बसने प्रवास करतात. मात्र, काही महिला विनातिकीट प्रवास करत असल्याचेही आढळून आले आहे. तिकीट तपासणीसाठी सध्या पीएमपीकडे विविध पथके आहेत. या पथकांकडून बसमध्ये अचानक जाऊन प्रवाशांची तिकिटे तपासली जातात.तेजस्विनी बसमध्येही ही पथके जातात. पण, अनेकदा काही महिलांकडून या पथकातील पुरुष कर्मचाºयांना सहकार्य केले जात नाही. त्यांच्यावर विविध प्रकारे आरोप केले जातात. याबाबत प्रशासनाकडेही तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने पहिल्यांदाच तिकीट तपासणीसाठी खास दामिनी पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.‘पीएमपी’मध्ये सध्या जवळपास १३७ महिला वाहक आहेत. त्यापैकी वरिष्ठ वाहकांकडून दामिनी पथकात निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील चार वरिष्ठ कर्मचाºयांची निवड करण्यात आली. त्यांना तिकीट तपासणीचे प्रशिक्षण दिले जाईल. दररोज किमान तीन कर्मचारी या पथकामध्ये असतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन दिले जाणार आहे. हे पथक दिवसभर केवळ तेजस्विनी बसमध्ये तिकीट तपासणी करणार आहे. त्यामुळे आता या बसमधील फुकट्या महिला प्रवाशांवर वचक ठेवता येणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेroad transportरस्ते वाहतूक