शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पराभव झाल्याने उकरला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 01:37 IST

पानसरेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पराभव सहन न झाल्याने एका व्यक्तीने पानसरेवाडीतून कासारमळ्याकडे जाणारा सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरला आहे.

सुपे  - पानसरेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पराभव सहन न झाल्याने एका व्यक्तीने पानसरेवाडीतून कासारमळ्याकडे जाणारा सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरला आहे. येथील मार्गच बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.पानसरेवाडी येथील गावठाणापासून दोन किलोमीटरवर कासारमळा आहे. यापूर्वी येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. मात्र मागील पंधरा वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने रस्त्याचे काम मार्गी लावले. त्यामुळे कासारमळ्याकडे जाण्यासाठी खडी व मुरमीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र मागील तीन महिन्यापूर्वी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत बाळासाहेब जयसिंग पानसरे यांचा पराभव झाला. येथील नागरिकांनी मला मतदान केले नाही. मला पराभव स्वीकारावा लागला. या कारणास्तव पानसरे यांनी स्वत:च्या शेतातून जाणारा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरला आहे. त्यामुळे कासारमळ्याकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोयझाली आहे.कुठलाही रस्ता शासकीय खर्ची पडलेला असेल आणि कोण व्यक्ती तो रस्ता बंद करीत असेल, तर त्याच्यावर ग्रामसेवकाने फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.- हनुमंत पाटील,तहसीलदार, बारामती तालुकायेथील नागरिकांना येण्या-जाण्याची गैरसोय झाली आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन दिले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण