शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दलितांना राजकीय नेतृत्वापासून ठेवले वंचित - गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:15 IST

डॉ. नीलम गोऱ्हे : जातिव्यवस्थेच्या चौकटीत अडकविले

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीवर वाटचाल करणाऱ्या दलित समाजातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मेहनत घेण्याची क्षमता आहे. समपर्ण आणि एकनिष्ठेमुळे राजकीय क्षेत्रात येऊन उत्तम उदाहरणे घालून दिली असती, परंतु प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने त्यांना जातीच्या चौकटीत अडकवून ठेवत त्यांच्यातील राजकीय नेतृत्व उमलूच दिले नाही, अशी खंत विधान परिषदेच्या प्रतोद आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी शनिवारी व्यक्त केली.

आडकर फौंडेशन आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा धम्मक्रांती पुरस्कार यंदा महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून दलाईलामा यांचे शिष्य भन्ते राजरतन आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर होते.डॉ. गोºहे म्हणाल्या, प्रत्येकाचे आपले वेगळ एक राजकारण असते परंतु महाराष्ट्र आणि देशाच्या भल्यापुढे कोणतेच राजकारण करु नये. अलीकडे सभोवताली पाहिले तर जातीयतेची तेढ वाढविणारे कारखाने तयार झाले आहेत की काय अशी शंका येते. समाजातील हिंसात्मक वृत्ती वाढत चालली आहे. धुळे जिल्ह्यात घडलेली घटना त्याचे जिवंत उदाहरण आहे. अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्यामची आई फौंडेशनचे भारत देसडला यांनी आभार मानले. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेShiv Senaशिवसेना