शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

लाखेवाडीत दलित कुटुंबावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2015 00:13 IST

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील दलित कुटुंबीयांवर शेतजमीन व रस्त्याच्या जुन्या वादातून शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी सामूहिक प्राणघातक हल्ला करण्यात आला.

बावडा : इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील दलित कुटुंबीयांवर शेतजमीन व रस्त्याच्या जुन्या वादातून शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी सामूहिक प्राणघातक हल्ला करण्यात आला. विलास भिंगारदिवे यांच्या कुटुंबातील महिलांसह ११ जणांना जखमी करण्यात आले आहे. यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपींवर अ‍ॅस्ट्रॉसिटीसह अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पाच मुख्य आरोपींसह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एकाला तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी विलास भिंगारदिवे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी राजेंद्र उर्फ राजू बाळकृष्ण शिंगाडे, संजय बाळकृष्ण शिंगाडे, किरण दीपक खुरंगे, महादेव पांडुरंग खुरंगे, विलास पांडुरंग खुरंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या हल्ल्यात विलास रघुनाथ भिंगारदिवे (वय ५०), जानकी विलास भिंगारदिवे (वय ४५), रघुनाथ दादा भिंगारदिवे (वय ७०), दिलीप विलास भिंगारदिवे (वय १९), प्रदीप विलास भिंगारदिवे (वय २९), जया समाधान कांबळे (वय ३५), समाधान मल्हारी कांबळे (वय ४०), पुष्पा प्रदीप भिंगारदिवे (वय २५), तसेच तीन लहान बालके जखमी झाली आहेत. त्यांच्यावर बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. तर, प्रदीप भिंगारदिवे, दिलीप भिंगारदिवे, समाधान भिंगारदिवे यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा हल्ला होत असताना भयभीत झालेल्या महिला व मुली घाबरून पळत असताना या हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करून विनयभंग व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात आरोपींनी लोखंडी खिळे ठोकलेली लाकडी दांडकी, लोखंडी पाईप, लोखंडी गजाचा वापर केला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, भिंगारदिवे कुटुंबीयांवर उपचार सुरू असताना संशयितांनी त्यांच्या घरालगतची स्वयंपाकाची झोपडी पेटवून दिली. यात त्यांचे प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भिंगारदिवे वस्तीनजीक असलेल्या जमिनीत काही धनदांडग्यांनी अतिक्रमण केल्याच्या कारणावरून विलास भिंगारदिवे यांचा किरण खुरंगे व राजेंद्र शिंगाडे यांच्याशी वाद होता. त्यातूनच ही दुर्घटना घडली. (वार्ताहर)घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन..-या घटनेच्या निषेधार्थ लाखेवाडी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर, इंदापूर पोलीस ठाण्यासमोर पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, बावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनादेखील सहआरोपी करून निलंबित करावे, अशी मागणी करुन त्यांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. -या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी या गुन्ह्याचा नि:पक्षपातीपणे तपास करुन आरोपींना लवकरच अटक करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. -उपविभागीय पोलीस अधिकारी मोरे यांच्यासह इंदापूरचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. गावात तणावपूर्ण वातावरण आहे. भिंगारदिवे वस्तीवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे...तर आजचा अन्याय झाला नसता-भिंगारदिवे वस्तीपासून नीरा भीमा ते लाखेवाडी जाणारा पाणंद रस्ता अडविण्यात आला आहे. त्यामुळे भिंगारदिवे कुटुंबाची मोठी गळचेपी झाली होती. याबाबत बावडा पोलिसांकडे, इंदापूर तहसील विभागाकडे तक्रार करुनदेखील दखल घेण्यात आली नाही. काही महिन्यांपूर्वी भिंगारदिवे यांच्या आई यांचा मृत्यू झाला. त्या वेळी अंत्ययात्रा या रस्त्याने अडवण्यात आली होती. तसेच, त्यांच्या मुलीच्या लग्नातदेखील धनदांडग्यांनी अडवणूक केली होती.पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्याकडे भिंगारदिवे यांनी वारंवार तक्रार करुनही त्यांनी आरोपींना पाठीशी घातले. त्यांनी वेळीच दखल न घेतली असती, तर अन्याय झाला नसता, अशी प्रतिक्रिया भिंगारदिवे यांनी व्यक्त केली.