शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

दररोज चोरीला जातात ९ वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 2:01 AM

उघडकीस येण्याचे प्रमाण सर्वांत कमी

पुणे : पुणे शहरातून दररोज सरासरी ९ वाहने चोरीला जात असून, त्या उघडकीस येण्याचे प्रमाण सर्व गुन्ह्यांमध्ये मात्र सर्वांत कमी आहे़ १ जानेवारीपासून ३० जूनअखरेपर्यंत १ हजार ५५२ वाहने चोरीला गेली आहेत़सर्वसामान्य नागरिक गरज म्हणून वाहन खरेदी करतात़ प्रामुख्याने कर्ज घेऊन नागरिक स्वत:साठी अथवा आपली पत्नी, मुलांसाठी दुचाकी वाहने खरेदी करत असतात़ एक गरज म्हणून खरेदी केलेल्या हे वाहन चोरीला गेल्यावर त्यांची मोठी कुचंबणा होते़ पोलीस ठाण्याला गेल्यानंतर त्याला सर्वप्रथम दोन दिवस शोध घ्या, असा सल्ला दिला जातो़ त्यानंतर त्याने आग्रह केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येतो़ चोरीला गेलेल्या आपल्या वाहनाचा तपास लागावा अशी त्यांची अपेक्षा असते़ अनेकदा वाहन चोरीला जाण्यामध्ये काही अंशी त्यांचाही दोष असतो़ व्यवस्थित गाडी पार्क न करण्यापासून चावी गाडीलाच सोडून देणे, असे प्रकारही घडताना दिसत असतात़या वर्षी जूनअखेर १५५२ वाहने चोरीला गेली असून, गेल्या वर्षी २०१७ मध्ये १४८६ वाहने चोरीला गेली होती़ तर,यंदा जून अखेर ३८० गुन्हे उघडकीस आले आहेत़ गेल्या वर्षी जूनअखेर ५११ गुन्हे उघडकीस आले होते़याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, वाहनचोरी रोखण्यासाठीआणि चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक आहे़ वाहन चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जाते़ तसेच, नियमितपणे नाकाबंदीद्वारे संशयित वाहनांची तपासणीकरण्यात येते़२०१७ वर्ष : ३ हजार १६९ वाहने चोरीला२०१७ मध्ये संपूर्ण वर्षभरात ३ हजार १६९ वाहने चोरीला गेली होती़ त्यापैकी ९६३ गुन्हे उघडकीस आले असून, त्याचे प्रमाण २९ टक्के इतके आहे़ चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे़ २०१६ मध्ये ३ हजार ७३ वाहने चोरीला गेली होती़ त्यातील ९९५ गुन्हे उघडकीस आले होते़ हे प्रमाण ३२ टक्के इतके होते़वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शहर पोलीस दलाकडून प्रयत्न केले जातात़ त्यात प्रामुख्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, दररोज नाकाबंदी करून संशयितांची वाहनांची तपासणी करणे, जेथे जुनी वाहने विकली जातात़ तेथे जाऊन वेळोवेळी तपासणी करून चोरीची वाहने विकली जात तर नाही ना, याकडे लक्ष ठेवले जाते़ अचानक चेकिंग केले जाते़ असे असले तरी, वाहनचोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्यात आता मोटारींच्या चोरीच्या घटना वाढत आहे़

टॅग्स :carकारtheftचोरी