शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प

By admin | Updated: November 17, 2016 01:29 IST

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम वडगाव निंबाळकर येथील दैनंदिन व्यवहारावर झाला आहे.

वडगाव निंबाळकर : केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम वडगाव निंबाळकर येथील दैनंदिन व्यवहारावर झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत जणू आर्थिक मंदीच आली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जिल्हा बँकांना पैसे स्वीकारण्यास रिझर्व बँकेने मनाई केली आहे. गावातील नागरिकांची, शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. परिणामी, बँकेत पाचशे, हजारच्या नोटा भरण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.वडगाव निंबाळकर हे आठवडी बाजारचे गाव असल्याने परिसरातील कोऱ्हाळे खुर्द, चोपडज, सदोबाचीवाडी, होळ, मुढाळे येथील नागरिक दैनंदिन खरेदीसाठी येथे येतात. मात्र, केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा व्यवहारावर परिणाम झाला आहे. व्यवहारात ५,१0, २0, ५0, १00 रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किराणा, कापड, मेडिकल दुकानात चिल्लरचा तुटवडा जाणवत आहे. गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व बँक आॅफ महाराष्ट्र अशा बँका आहेत. पण, दोन्ही बँकापैकी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सुविधा नाही. महाराष्ट्र बँकेचे एटीएमचे शटरच बंद आहे. त्यामुळे नागरिकांना बँकेत पैसे भरणा करण्यासाठी व पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. पोस्ट आॅफिसमध्ये पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने नोटा बदलून घेण्यासाठी सामान्य नागरिकांची बँका, पेट्रोलपंपासह विविध ठिकाणी एकच गर्दी होऊ लागली आहे. लहान-मोठे व्यावसायिक, दुकानदारांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बाजारातदेखील शुकशुकाट जाणवत आहे. (वार्ताहर)