शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

संततधार पावसात दहीहंडीचा जल्लोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 23:03 IST

यंदा प्रथमच ३१ मंडळांनी एकत्र येऊन लाल महल चौकामध्ये संयुक्त दहीहंडी आयोजित केली.

पुणे : ‘मच गया शोर सारी नगरी रे’, ‘मोरया मोरया’ आदी गीतांवर थिरकत... छातीत धडकी भरेल असा दणदणाट करत, संततधार पावसाच्या सरीवर सरी झेलत... गोविंदांनी मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा केला. शहर, उपनगरांतील दहीहंडी उत्सवात लाखो रूपयांच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली. ढोल-ताशाच्या दणदणाटात मंगळवारी (दि. २७) दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा झाला.

यंदा प्रथमच ३१ मंडळांनी एकत्र येऊन लाल महल चौकामध्ये संयुक्त दहीहंडी आयोजित केली. ते यंदाचे विशेष आकर्षण ठरले, तर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात दहीहंडीची तयारी दिमाखात केली होती. शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या. उंच दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

दरम्यान, दहीहंडीनिमित्त शहराच्या मध्य भागात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते. सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. छत्रपती शिवाजी रस्ता, महात्मा फुले मंडई, हुतात्मा बाबू गेणू चौक, आप्पा बळवंत चौक, टिळक रस्त्यावरील साहित्य परिषद चौक, नवी पेठेत सायंकाळनंतर मोठी गर्दी पाहायला मिळाली.दहीहंडीचा जल्लोषसुवर्णयुग तरुण मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ या मंडळांच्या दहीहंडीचा जल्लोष अनुभवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली हाेती. दहीहंडी फोडणाऱ्या संघांना मोठ्या रकमेची पारितोषिके जाहीर करण्यात आली होती.विविध रस्ते बंदपाण्याचे फवारे अंगावर घेऊन बेधुंद होऊन नाचण्यासाठी गोपाळभक्तांसह गोविंदांनी शहराच्या मध्यवर्ती भागात दहीहंडी मंडळांपुढे मोठी गर्दी केली होती. दहीहंडी सोहळा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पोलिस आणि वाहतूक विभागाकडून प्रमुख रस्त्यांसह काही अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. त्यामुळे नदीपात्र किंवा जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावून गोविंदा दहीहंडीचा आनंद घेत होते....अन् तरुणाई थिरकलीदाक्षिणात्य चित्रपटांतील गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यंदाच्या इल्लूमिनाथी हे गाणे दहीहंडीत आकर्षणाचा विषय ठरले. यासह गोविंदा आला रे, आला.., चांदी की डाल पर, मच गया शोर..., सुनो गौर से दुनियावालो..., गो गो गोविंदा, गोविंदा रे गोपाळा आदी गाण्यांचा समावेश आहे.पुणेकर अडकले वाहतूककोंडीतशहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यांवर गोपाळा, गोविंदाचा गजर करत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यातून मार्ग काढताना दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागली. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी