शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

अत्रे पुरस्काराने आयुष्य धन्य झाले , दमांची कृतार्थ भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:19 IST

मिडास राजा हात लावेल त्याचे जसे सोने व्हायचे. तसे आचार्य अत्रेंनी ज्या गोष्टीत हात घातला, त्याचे सोने झाले. ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केले त्या अत्रेंच्या नावाच्या पुरस्काराने माझे आयुष्य धन्य झाले

पुणे : मिडास राजा हात लावेल त्याचे जसे सोने व्हायचे. तसे आचार्य अत्रेंनी ज्या गोष्टीत हात घातला, त्याचे सोने झाले. ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केले त्या अत्रेंच्या नावाच्या पुरस्काराने माझे आयुष्य धन्य झाले, अशा शब्दातं ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी कृतार्थ भावना व्यक्त केली.साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त आत्रेय संस्थेतर्फे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मिरासदार यांना आचार्य अत्रे मानचिन्ह प्रदान करण्यात आले. परचुरे प्रकाशनातर्फे आचार्य अत्रे संपादित ‘नवयुग वाचनमाला’च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन या वेळी झाले. अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे, नातू अ‍ॅड. राजेंद्र पै, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि प्रकाशक अप्पा परचुरे या प्रसंगी उपस्थित होते. उत्तरार्धात डॉ. गिरीश ओक यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तो मी नव्हेच’ नाटकाचा प्रयोग झाला.प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘‘१९६२मध्ये मी विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेले तेव्हा अत्रे यांची अनेक घणाघाती अशी प्रभावी भाषणे मी ऐकली आहेत. ते शिक्षक, राजकारणी, साहित्यिक, विनोदकार होते. त्यांचे लेखन वाचण्याची संधी मला त्या काळात मिळाली होती. साहित्यिक हे शब्दप्रभू असतात. उत्तम निर्मितीची प्रतिभा त्यांच्याकडे असते. आपल्या वाङ्मयनिर्मितीद्वारे ते समाजाला मार्गदर्शन करतात. साहित्यिक समाजाची अनमोल ठेव आहेत. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या