शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

ढोलवादनातून ‘ति’ने शोधला मुक्तीचा राजमार्ग

By admin | Updated: July 6, 2017 03:50 IST

नोकरी, घर आणि मुले हे सगळे पाहून ढोल-ताशा सरावासाठी रोजचे दोन तास देणे तशी अवघड गोष्ट. आपले रोजचे व्याप सांभाळून महिला, युवती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नोकरी, घर आणि मुले हे सगळे पाहून ढोल-ताशा सरावासाठी रोजचे दोन तास देणे तशी अवघड गोष्ट. आपले रोजचे व्याप सांभाळून महिला, युवती या ढोलपथकात हमखास वर्णी लावतात. त्यात ढोल किंवा ताशा कमरेला अडकवून तो सलग दोन-अडीच तास वाजवणे हे मुलींसाठी फारसे सोपे नाही. पण एकदा का ढोलवर टिपरी पडून त्याचा नाद घुमायला लागला, की बाकी आयुष्यातील सगळे व्याप, तणाव, मेहनत आदी गोष्टी मागे पडतात आणि उरतो फक्त तो मोरयाच्या जयघोषातला वाद्यांचा सुरेल नाद...! सुखाच्या नव्या स्वच्छंदी तालात स्वत:ला मुक्त व्यक्त करण्यासाठी तिला गवसला आहे ढोलपथकाचा एक नवा मार्ग...!महिलांचा ढोलपथकातील वाढता सहभाग पाहता या उत्साहाच्या पडद्यामागचा शोध घेताना उलगडले मुलींच्या सहभागाचे काही मजेशीर प्रसंग... ढोलपथकांच्या प्रचलित महतीमुळे आई-वडिलांची परवानगी मिळणेही आजकाल अवघड राहिलेले नाही. ढोल वाजविण्यापेक्षा तो कमरेला व्यवस्थित बांधणे व सांभाळणे हे एक दिव्य असते. कारण तो जास्त घट्ट बांधला गेला तर वादकाला त्रास होतो. सैल बांधला गेला तर घसरून जातो. त्याच्यावर सतत आघात होत असतात. त्यामुळे त्याची पोझिशन सतत स्थिर आणि वादकाला सुखावह अशी राहणे महत्त्वाचे असते. अशी पोझिशन राखता येईल, अशा रीतीने ढोलताशा कसा बांधायचा, हे शिकण्यापासून सुरुवात होती. ढोलताशा हा वाजविण्यापूर्वी पाहणी करावी लागते. म्हणजेच त्याच्या दोन्ही पृष्ठभागांना आवश्यक तो ताण त्याचे स्क्रू अथवा नटबोल्ट पिळून ते योग्य रीतीने आवाज काढतील, अशा रीतीने अ‍ॅडजस्ट करावे लागतात. हे बारकावे शिकण्यापासून महिलांची सुरुवात होते. ढोल आणि ताशा वाजविणे हे अत्यंत ताकदीचे काम आहे. ढोल-ताशा उत्तम वाजविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काड्या अथवा काठ्या यांच्यावरील पकड व त्यांचा आघात करण्याची शैली हेदेखील आत्मसात करण्याचे अवघड आव्हान या महिलांनी सहजपणे पेलले. ढोल उत्तम वाजविता येण्यासाठी वादकाला अ‍ॅक्शनही कराव्या लागतात.ढोल-ताशावादनातून या नव्या आविष्कारामुळेच अवघ्या पाच वर्षांच्या काळात महिलांचे ढोल-ताशा पथक हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही सांस्कृतिक सोहळ्याचे अविभाज्य अंग ठरले. आता त्याकडे नवी पिढी नवे करिअर म्हणून पाहू लागली आहे. अनेक शाळा आणि कॉलेजांमध्ये असे पथक तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत व त्यांना भरघोस असा प्रतिसादही लाभतो आहे.स्वतंत्र पथकया सरावाच्या काळात तिच्या मनातले कित्येक व्याप, दडपण, नैराश्य, दु:ख आदी समस्यांवर दणक्यात आत्मविश्वासपूर्वक मात करते. केवळ हौस आणि नवीन काहीतरी करण्याची आवड याही भूमिकेतून दीड दशकापूर्वी या क्षेत्रात महिलांचा या पथकांत चंचुप्रवेश झाला होता. यापैकी काही युवती आणि महिलांनी या वादनामध्ये प्रावीण्य संपादन केले. त्यातूनच मग ढोलताशाचे स्वतंत्र पथक साकार करण्याची आगळीवेगळी कल्पना जन्माला आली. पुण्याच्या विमलाबाई गरवारे प्रशाला येथे त्याचा श्रीगणेशा झाला. नववर्षाच्या स्वागत यात्रा, दसऱ्याची शोभायात्रा अशा प्रसंगी महिलांचे ढोलपथक हे सर्वाधिक आकर्षण केंद्र ठरू लागले. त्यातूनच अशा पथकांची संख्या वाढत आहे.इंजिनीअरिंग महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे. अभ्यास करून वेळ देते. सराव झाल्यानंतर रात्री जाऊन अभ्यास करते. दरवर्षी ढोल वाजवणे कंटाळवाणे वाटत नाही. या सर्व प्रक्रियेत केवळ नृत्य वा ढोल महत्त्वाचा नाही, तर त्यातून मिळणारा अनुभव, होणारे शिक्षण महत्त्वाचे आहे. या सगळ्या अनुभवातून या युवतींमध्ये नेतृत्वगुण विकसित होत असतात.- ऋता भोरेमाझ्या मुलीला मी ताशाच्या सरावाला सोडण्यासाठी येत होते. त्यानंतर मीदेखील ढोल पथकामध्ये सामील झाले. ढोल पथकात आल्यानंतर वेळेचे काटेकोर नियोजन करणे, परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वास, समूहात वागण्याचे शिक्षण, न थकता मेहनत करण्याची जिद्द येते. पथकात आल्यानंतर माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. मी फक्त गृहिणी न राहता माझे सर्व छंद जोपासण्यास मदत झाली. ढोलवादनामुळे माझ्या कौशल्याने असा काही जोश भरला, की आमच्या कानावर ढोल-ताशाचे वादन पडले, की आमचे शरीर आपोआप त्यावर ठेका धरते.- श्रद्धा गोखलेझील स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेत आहे. ढोल व तोशा दोन्ही वाजविता येतो, पण मला ताशा वाजवायला खूप आवडते. संगीताच्या ओढीने मी पथकामध्ये सहभागी होऊन वाद्य वादनाकडे वळले. सिव्हिलचे शिक्षण घेत असल्यामुळे अभ्यास खूप करावा लागतो. पण वाद्यवादनामुळे दिवसभराचा शीण दूर होतो. खूप एनर्जी मिळते. नीट नियोजन करून अभ्यास व पथकाचा सराव केल्यामुळे त्रास होत नाही.- काजल बोडरेगेल्या तीन वर्षांपासून मी गजराज पथकामध्ये वादन करीत आहे. सुरुवातीला एकटी असलेल्या अंकिताने दोन-तीन मैत्रिणी वादनासाठी तयार केल्या. त्यानंतर आता सुमारे १०५ मुली या पथकात वादनासाठी तयार झाल्या आहेत. त्या म्हणाल्या,की आम्ही आता नवीन येणाऱ्या मुलांनाही शिकवतो. आम्ही नोकरी करून पथकात वादनाला येतो. सायंकाळी ६.३० ते ९ वाजेपर्यंत आमचा सराव चालू असतो.- अंकिता शेंडगे