शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कुसूर येथील सिलिंडरच्या स्फोटात घर भस्मसात ; पाच लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 8:03 PM

जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्यालगत जुन्नर-वडज रस्त्यावर  असलेल्या तलाखी वस्ती, कुसूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत संंपूर्ण घर भस्मसात झाले. महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देजीवितहानी झाली नाही; परंतु घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

कुसूर येथील सिलिंडरच्या स्फोटात घर भस्मसात ; पाच लाखांचे नुकसान   जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्यालगत जुन्नर-वडज रस्त्यावर  असलेल्या तलाखी वस्ती, कुसूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत संंपूर्ण घर भस्मसात झाले. महसूल विभागाच्या कर्मचायांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. स्फोटामुळे पांडुरंग बबन मोधे यांच्या घरासह संसारोपयोगी सर्व साहित्य, अन्य सामान तसेच कागदपत्रे जळून गेल्याने त्यांचे जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे मंडल अधिकारी आर. व्ही. सुपे व तलाठी पी. आर. इंगळे यांनी सांगितले. तलाखीवस्ती, कुसूर येथील पांडुरंग मोधे यांच्या सूनबाई गीता या गुरुवारी  सायंकाळी घरात स्वयंपाक करीत असताना गॅस सिलिंडरच्या नळीने पेट घेतला. त्यांनी ताबडतोब घरातील छोट्या मुलाला घेऊन बाहेर पळ काढला. त्या घराबाहेर पडल्यावर लगेचच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट होण्यापूर्वीच घराबाहेर पडल्याने मुलांसह गीता यांचे प्राण वाचले.  आग लागली तेव्हा घरात त्या एकट्याच होत्या. घरातील अन्य पाच सदस्य बाहेर गेले होते. यामुळे जीवितहानी झाली नाही; परंतु घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळाल्याने अंगावरील कपड्यांशिवाय त्याच्याकडे काहीच राहिलेले नाही.परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल २ तासांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी  भेट देऊन मोधे कुटुंबीयांना जवळपास ८१ हजारांची मदत केली. 

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडरJunnarजुन्नर