शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सायकलवैभव परतणार! स्वतंत्र मार्गाचे जाळे, पाच कंपन्यांनी दिले प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 06:26 IST

एकेकाळी सायकलींचे शहर ही पुण्याची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी नव्या सायकल आराखड्यात तब्बल ८३४ किलोमीटरचे सायकल मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. सुमारे १ लाख सायकली शहरात धावू शकणार आहेत.

पुणे : एकेकाळी सायकलींचे शहर ही पुण्याची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी नव्या सायकल आराखड्यात तब्बल ८३४ किलोमीटरचे सायकल मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. सुमारे १ लाख सायकली शहरात धावू शकणार आहेत. त्यांच्यासाठी ५ हजार सायकल स्टेशन आणि काही हजार सायकल तळ तयार करण्याचे नियोजन आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील अनेक रस्त्यांवर सायकल ट्रॅक उभारण्यात आले. मात्र, त्यातील बहुतांश सध्या निरुपयोगी आहेत. नव्या सायकल योजनेची तशीच गत होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पुणे महापालिकेत गुरुवारी सायकल आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तीन वर्षांच्या कालावधीसाठी या प्रकल्पाला ३३५ कोटी रुपये खर्च गृहित धरण्यात आला आहे.महापालिकेने एका खासगी कंपनीकडून हा सायकल शेअरिंगचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे अनुदानही महापालिकेला मिळाले आहे. पुण्याचे सायकलवैभव परतून आणण्याची हमीच या प्रकल्प अहवालात देण्यात आली आहे. तो वाचूनच सायकलींच्या देश-परदेशातील पाच कंपन्यांनी महापालिकेकडे हे काम करण्याची त्यांची इच्छाही लेखी स्वरूपात व्यक्त केली आहे.तीन प्रकारचे सायकलमार्ग यात सूचित करण्यात आले आहेत. विभक्त सायकलमार्ग - रहदारीच्या रस्त्यापासून १ मीटर रुंद सोडणे. रंगीत सायकलमार्ग- अरुंद रस्त्यावर रस्त्याच्याच एका बाजूला रंग लावून सायकल लेन तयार करणे. हरित सायकलमार्ग- कॅनॉल, ओढे, नद्या, टेकड्या यांच्यालगत हरित सायकल लेन (ग्रीन वे) तयार करणे.शहराचा मध्यवर्ती भाग सायकल व पादचारी स्नेही करण्यासाठीही काही उपाय सुचवण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील विशिष्ट रस्ते मोटार व दुचाकीमुक्त करावेत. मध्यवर्ती भागाभोवती वर्तुळाकार मार्ग प्रस्तावित करावा व त्यावर वाहतूक होऊ देऊ नये, जुन्या इमारती, शाळा, मोकळी मैदाने यामध्ये सायकल तळासाठी प्राधान्य द्यावे, रस्त्यांवरही एका बाजूने पूर्ण सायकलतळ ठेवावा, त्याला शुल्क आकारू नये, सायकल स्टेशन्स मेट्रो, सार्वजनिक बस वाहतूक, रिक्षा थांबे यांच्याजवळ असावीत. एका ठिकाणाहून घेतलेली सायकल दुसºया ठिकाणी जमा करता यावी, असे नमूद करण्यात आले आहे.सायकल झोनची निर्मिती- यानुसार शहरात विविध ठिकाणी सायकल झोन तयार करण्यात येणार आहेत. सायकल देण्याघेण्याचे व्यवहार या झोनमधून होतील. त्यासाठी तिथे स्वतंत्र व्यवस्था असेल. वाहतूक पोलीस, आरटीओ यांचे साह्य यासाठी घेण्यात यावे. सायकल शेअरिंग योजनेतील सायकलींशिवाय झोनमध्ये खासगी सायकलीही ठेवण्याची मुभा असेल. दुचाकी किंवा अन्य वाहनांना मात्र तिथे मनाई असेल.सायकलिंगचा प्रसार व्हावा यासाठीही काही उपाय सुचवण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने महापालिकेत सायकल विभाग हा स्वतंत्र विभाग करावा, त्यावर अधीक्षक अभियंता श्रेणीचे अधिकारी नियुक्त करावेत, असे नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय या विभागात तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारी द्यावेत. सायकल शेअरिंगची सर्व जबाबदारी या विभागाची असेल. हा विभाग सायकल शेअरिंगमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये काय चालले आहे त्याची अद्ययावत माहिती ठेवेल व त्याचा उपयोग शहरातील योजनेसाठी वेळोवेळी करेल.- सायकल वापरासाठी प्रत्येक वेळेला सुटे पैसे वगैरे द्यावे लागणार नाहीत. महापलिका त्यासाठी स्वतंत्र मी कार्ड तयार करणार आहे. हे कार्ड वापरले की त्यातून पैसे चुकते होतील. तसेच सायकलला असलेले कुलूप हेच सुरक्षा कुलूप आहे. संपूर्ण स्वयंचलित असलेली डॉकलेस यंत्रणा त्यासाठी वापरण्यात येणार आहे. यात स्मार्टफोन किंवा त्यासारख्या तंत्राच्या साह्यानेच कुलूप उघडता येते.- तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे १ लाख सायकली घेण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडे आताच पाच कंपन्यांचे प्रस्ताव आले आहेत.- शहरातील रस्त्यांची पाहणी करून आता याप्रमाणे सायकलींसाठी मार्ग तयार करण्यात येतील. रस्त्याच्या डाव्या बाजूने४३१व उजव्या बाजूने३९३असे एकूण८२४किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅक शहरात या योजनेतंर्गत तयार होतील.

टॅग्स :Puneपुणे