शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकराजाला... सूट नव्हे ‘लूट’ ! खासगी मॉलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 03:01 IST

काही दिवसांपूर्वी खरेदीकरिता रवी वर्मा कर्वे रस्त्यावरील एका मॉलमध्ये गेले; मात्र त्याठिकाणी खरेदी केल्यावर प्रत्यक्षात बिल व त्यावर आकारण्यात आलेला जीएसटी बघून त्यांना धक्काच बसला.

- युगंधर ताजणेपुणे : काही दिवसांपूर्वी खरेदीकरिता रवी वर्मा कर्वे रस्त्यावरील एका मॉलमध्ये गेले; मात्र त्याठिकाणी खरेदी केल्यावर प्रत्यक्षात बिल व त्यावर आकारण्यात आलेला जीएसटी बघून त्यांना धक्काच बसला. वस्तूच्या मूळ किमतीवर जीएसटी घेण्यास मनाई असताना, मूळ किमतीवर सवलत देऊन त्या सवलतीच्या रकमेवर त्यांच्याकडून जीएसटी आकारण्यात आला. यावर त्यांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला असता उडवाउडवीची उत्तरे मॉल व्यवस्थापनाकडून मिळाली.लॉ कॉलेज रस्त्यावर राहणाऱ्या रवी वर्मा यांच्याकडे ५०० रुपयांचे कुपन होते. त्याची वैधता १ ते १५ जून दरम्यान होती. ते खरेदीसाठी मॉलमध्ये गेले असताना त्यांनी १४९९ रुपयांची एक जिन्स पँट खरेदी केली. बिल देताना त्यांच्याकडील ५०० रुपयांच्या कुपनची रक्कम वजा केली असता त्यांच्याकडून ९९९ रुपये घेणे अपेक्षित असताना वर्मा यांना प्रत्यक्षात १०४८ रुपये द्यावे लागले.याविषयी मॉलमधील व्यवस्थापकाला विचारणा केली असता, त्यांनी आकारण्यात आलेला जीएसटी हा मूळ कि मतीवर नसून सवलतीच्या दरावर आकारला असल्याचे सांगितले. याप्रकारे जीएसटी आकारण्याची परवानगी आपल्याला आहे का? असे सांगितले असता त्यांनी आपल्याला वरिष्ठांकडून ज्या सूचना मिळाल्या आहेत आपण त्याचे पालन करीत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या गाइडलाइन्सअसून आम्ही नियमानुसारच ग्राहकांकडून जीएसटी आकारत असल्याचे स्पष्ट केले.नो जीएसटी आॅन एमआरपी आफ्टर डिस्काउंटचंडीगढमधील मॉलमध्ये विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलत देऊन सवलतीच्या दरावर जीएसटी आकारण्याचे जोरदार प्रकार सुरू होते. त्या वेळी तेथील नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यात आली. यानंतर विक्रेत्यांना एमआरपीवर सवलत देऊन त्यावर जीएसटी आकारता येणार नसल्याचे ग्राहक संरक्षण कौन्सिलच्या वतीने सांगण्यात आले. यासंबंधीच्या घटनेची त्या वेळी माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली होती.तर दंड भरावा लागेल...पूर्वी वेट अ‍ॅन्ड मेजरमेंट अ‍ॅक्ट होता. आता इंडियन मेट्रोलॉजी अ‍ॅक्ट आला आहे. त्यानुसार उत्पादनांवर एमआरपी नमूद केली जाते. त्याच्यातच विक्रेत्याचे कमिशन आणि नगाची किंमत याबरोबरच सगळे कर यांचा समावेश होतो. कि ंबहुना तो असायला हवा असा नियम आहे. त्याच्या व्यतिरिक्त वाढीव पैसे घेऊ नयेत. वास्तविक ग्राहकाने त्याविरोधात तक्रार केल्यास ग्राहकाला पैसे मिळतात आणि संबंधित विक्रेत्याला दंड भरावा लागतो. - चंद्रशेखर चितळे, सी.ए.प्रश्न एका ग्राहकाचा नसून लाखोंचा आहे...मॉलवाले ५०० रुपयांचा डिस्काउंट देतात; मात्र प्रत्यक्षात तो डिस्काउंट ४५० रुपयांचाच असतो. ही ग्राहकांची फसवणूक नाही का? दुसरे असे, आम्हाला डिस्काउंट द्या, अशी मागणी ग्राहकांची नसते. अशावेळी वस्तूंच्या मूळ किमतीवर जीएसटी न आकारण्याचा नियम असताना सवलतीच्या नावाखाली दुसºया मार्गाने जीएसटी घेण्याचा प्रकार मॉलमध्ये सरास सुरू असून, त्यावर कुणाचे बंधन नाही. प्रश्न हा केवळ एका ग्राहकाचा नसून तो लाखो ग्राहकांचा आहे. यावर शासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. - रवी वर्मा, तक्रारदार

टॅग्स :fraudधोकेबाजीPuneपुणेnewsबातम्या