शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कर्वे रस्त्यावर चक्राकार वाहतुकीने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:13 IST

मेट्रोच्या कामासाठी निर्णय : एसएनडीटी चौक बंद, महामेट्रोकडून वॉर्डनची नेमणूक

पुणे : उड्डाणपुलाच्या कामासाठी कर्वे रस्त्यावर सोमवारपासून (दि. १४) पुन्हा चक्राकार वाहतूक सुरू करण्यात आली. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलापासून एसएनडीटी विद्यापीठापर्यंत रस्ता दुभाजक टाकून एक बाजूचा रस्ता बंद करण्यात आला. याबाबत पुरेशी कल्पना न दिल्याने वाहनचालकांचा पुरता गोंधळ उडाला. तसेच कर्वे रस्त्यासह विधी महाविद्यालय रस्ता व लगतच्या रस्त्यांवरही वाहतूककोंडी झाली.

कर्वे रस्त्यावर अभिनव चौकामध्ये मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामाला काही दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. या कामासाठी पौड रस्त्याने नळस्टॉपकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्याचे आधीपासूनच प्रस्तावित होते. त्यानुसार काही वेळा वाहतुकीत बदलाचे प्रयोगही करण्यात आले. एसएनडीटी ते अभिनव चौकापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून ही वाहतूक कालवा रस्त्याने आठवले चौकातून अभिनव चौकाकडे वळविण्यात आली. पण यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. त्यामुळे हा प्रयोग लगेच थांबविण्यात आला. त्यानंतर महामेट्रोने कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला वाहतुकीचा अभ्यास करून पर्याय सुचविण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन पर्यायी मार्ग सुचविण्यात आले. दुचाकी, रिक्षा आणि कार व अन्य हलकी वाहने पौड रस्ता-एसएनडीटी-आठवले चौकाच्या दिशेने वळविणे व बस, ट्रक ही जड वाहने सरळ सोडणे हा एक पर्याय देण्यात आला.

या पर्यायाची अंमलबजावणी सोमवारी (दि.१४) दुपारनंतर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पौड रस्ता संपल्यानंतर काही अंतरापासून सिमेंटचे ब्लॉक टाकून रस्ता दुभाजक तयार करण्यात आला आहे.

हा दुभाजक एसएनडीटी विद्यापीठापर्यंत टाकण्यात आला आहे. दुभाजकामुळे रस्त्याचे दोन भाग झाले असून उजव्या बाजूने जड वाहने तर डाव्या बाजूने हलकी वाहने जावीत, असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.४रस्ता दुभाजकाने एक लेन अभिवन चौकात जाण्यासाठी बंद करण्यात आल्याची माहिती वाहनचालकांना दिली जात नव्हती. त्यामुळे पौड रस्ता तसेच कर्वे रस्त्याने येणारी अनेक वाहने दोन्ही लेनने पुढे जात होती. परिणामी ज्या वाहनचालकांना सरळ नळस्टॉपकडे जायचे होते, ती वाहनेही बंद केलेल्या लेनमध्ये गेली.ज्यांना विधी महाविद्यालय रस्त्याकडे जायचे होते, त्या चालकांना दुसºया लेनने सरळ नळस्टॉपकडे जावे लागले. त्यामुळे अनेकांना लांबचा वळसा घालावा लागला. या गोंधळामुळे अनेक वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. काही बसचालकांनी वळसा टाळण्यासाठी वॉर्डनला विनंतीही केली. पण बॅरिकेड हटविण्यातआलेले नाहीत.चक्राकार वाहतुकीत गोंधळाची भर पडल्याने विधी महाविद्यालय रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. रस्त्यावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कालवा रस्त्यावरही चालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कर्वे रस्त्यावर रस्ता दुभाजकाबाबत गोंधळाची स्थिती झाल्याने तिथेही कोंडी झाली होती.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी