शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:31 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत केंद्र शासनाकडून हालचाली केल्या जात असून देशभरातील हजारो नागरिकांनी याबाबत केंद्राकडे सूचना पाठविल्या आहेत

पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत केंद्र शासनाकडून हालचाली केल्या जात असून देशभरातील हजारो नागरिकांनी याबाबत केंद्राकडे सूचना पाठविल्या आहेत. त्यानुसार 2019 व 2020 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात काही बदल केले जातील.शारीरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, बुध्दीमत्तेला चालणा देणारी आणि विचार करण्यास लावणारी नवीन शिक्षण पध्दती यापुढील काळात राबविली जाईल,असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पुण्यात साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले,या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात जावडेकर बोलत होते.ते म्हणाले,विद्यार्थ्यांचा मेंदू म्हणजे डाटा बँक नाही. सध्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासक्रमाचे मोठे ओझे आहे. त्यातच मद्रास न्यायालयानेविद्यार्थ्यांची पुस्तकांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले आहे. पहिली व दुसरीला एक वदोन पुस्तके असावेत असे या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे 2019 व 2020मध्ये विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार टप्प्या-टप्प्याने कमीझालेला दिसेल.गुण मिळणे म्हणजे शिक्षण नाहीदहावी-बारावीमध्ये विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळाले तरीही पालकांचे समाधान झाल्याचे दिसत नाही. केवळ परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे शिक्षण नाही,असे नमूद करून जावडेकर म्हणाले,विद्यार्थ्यांकडे शारीरिक शिक्षणासाठी वेळ नाही. विद्यार्थ्यांना आपल्या भोवतालच्या गोष्टीतूनही शिक्षण घेता आले पाहिजे. त्यामुळे अध्यापन व अध्ययन याकडे लक्ष देवून विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल.सध्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे असलेले सर्जनशील कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही.परंतु, नवीन शिक्षण पध्दतीमध्ये याचा अंतर्भाव केला जाईल.