शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

वास्तूंना क्रांतिकारकांची नावे देणं कौतुकास्पद : शरद पवार

By admin | Updated: December 26, 2016 03:32 IST

सार्वजनिक नाट्यगृहे, रंगमंदिर आणि शाळांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची नावे

येरवडा : सार्वजनिक नाट्यगृहे, रंगमंदिर आणि शाळांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची नावे देणे म्हणजे हा या क्रांतिकारकांचा यथोचित सन्मान आहे. महाराष्ट्रात पुणे महापालिकेने सर्वप्रथम अशा प्रकारचा पुढाकार घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी काढले. येरवड्यात महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी आलगुडे, खासदार वंदना चव्हाण, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आमदार शरद रणपिसे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश म्हस्के, आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे उपस्थित होते. पवार म्हणाले, सामान्य परिस्थितीमुळे मर्यादीत शिक्षण घेऊनही मुंबईमध्ये कामगारांचे नेतृत्व करत असताना अण्णाभाऊंनी क्रांतिकारक साहित्याची निर्मिती केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला अण्णाभाऊंनीच सुरुवात केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी जोपर्यंत सामान्यांना पुरेसे अन्न मिळत नाही, तोपर्यंत या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही, असे विचार अण्णाभाऊंनी त्या काळात मांडले. पुण्यात शिक्षण घेत असताना आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांच्यासारख्या विचारवंतांची भाषणे व विचार शनिवारवाड्यावर ऐकायला मिळाले.’’ मुंबईवर लावण्या रचन्याबाबत पठ्ठे बापुरावांबरोबरच अण्णाभाऊंचे नाव घ्यावे लागेल, असे सांगत पवार यांनी अण्णाभाऊंनी मुंबईवर रचलेली एक लावणीही वाचून दाखवली. नगरसेविका मीनल सरवदे यांनी प्रास्ताविक केले. मीनल सरवदे व आनंद सरवदे यांनी पवार यांचा सत्कार केला.