पुणे : चार प्रभागांमध्ये नेमकी मतपत्रिका कशी राहणार आहे? एका पाठोपाठ उमेदवारांची नावे असतील, तर आमच्या उमेदवाराचे नाव नेमके कोठे असेल? या मतपत्रिकांचा रंग प्रत्येक गटासाठी सर्व प्रभागांत सारखा असणार आहे का?, या आणि अशा सारखे अनेक प्रश्न उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना पडले आहेत़ या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला़ घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांची एकत्रित बैठक शनिवारी आयोजित केली होती़ त्यात उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आपल्याला असलेले प्रश्न उपस्थित केले़ त्यामुळे अजूनही चारच्या प्रभागात नेमकी मतपत्रिका कशी असणार आहे, याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचली नसल्याचे जाणवले़ चारच्या प्रभागात अ, ब, क आणि ड असे गट आहे़ त्यातील राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि त्यानंतर अपक्ष यांची इंग्रजी वर्णाक्षरानुसार उमेदवारांचे क्रम असणार आहेत, अशी माहिती देण्यात आली़
मतपत्रिकेबाबत उत्सुकता
By admin | Updated: February 13, 2017 02:26 IST