शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्या व पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे देखावे पाहण्यासाठी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 06:17 IST

सलग सुट्या व पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शनिवारी शहराच्या मध्य भागात गणेशभक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठला. मानाच्या गणपतींचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांनी सर्वच प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले.

पुणे : सलग सुट्या व पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शनिवारी शहराच्या मध्य भागात गणेशभक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठला. मानाच्या गणपतींचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांनी सर्वच प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले. बाप्पाच्या जयघोषाने शहरभर उत्साह संचारला होता.गणेशोत्सवातील शनिवारी नववा दिवस होता. गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस पावसाने सातत्याने हजेरी लावली. तसेच, सुटीही नसल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी तुलनेने कमी गर्दी होती. मात्र, काही दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप दिली आहे. तसेच शनिवार व रविवारी सलग दोन दिवस शाळा व शासकीय कार्यालयांना सुटी आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी गौरी विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडू लागले. बाहेरगावांहून खास देखावे पाहण्यासाठी शहरात येणाºया गणेशभक्तांची संख्याही दर वर्षी मोठी असते. त्यामुळे शनिवारी प्रामुख्याने शहराच्या मध्य भागात देखावे पाहण्यासाठी मोठीगर्दी झाली. यंदाच्या गणेशोत्सवात शनिवारी पहिल्यांदाच गर्दीचा महापूर आला. तरुण-तरुणींसह अनेकजणांनी सहकुटुंब देखावे पाहण्याचा आनंद लुटला.शनिवारी दुपारनंतरच शहरात गर्दी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सायंकाळनंतर वाहतूक पोलिसांकडून काही रस्त्यांवर वाहनांना बंदी घालण्यात आली. प्रामुख्याने मानाच्या पाचही गणपतींसह आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनास भक्तांनी गर्दी केली होती. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता गर्दीने फुलून गेले.सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ यांसह परिसरातील देखावे पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. जिवंत देखाव्यांसह, सामाजिक, पौराणिक, विद्युतरोषणाईच्या देखाव्यांसमोर मोठी गर्दी होत होती. रविवारी गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव