शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसा सिंचनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:31 IST

संजय जगताप : राज्यमंत्री शिवतारे यांच्यावर घणाघाती आरोप

सासवड : पुरंदर तालुक्याला दुष्काळात वरदायिनी ठरलेली पुरंदर उपसा योजना ही शेतीसाठी बारमाही पाणी मिळण्यासाठी केली आहे. परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी व प्रसिद्धीसाठी या योजनेचा राजकीय वापर केला आहे. शेतकऱ्यांना पैसे भरल्यानंतर पाणी मिळते; परंतु त्याची पावती दिली जात नाही, पाण्याचा आणि पैशांचा कोणताही हिशेब ठेवला जात नाही, थकबाकी झाल्यावर पैसे शासन भरते, पाणीपट्टी, वीजपट्टी, देखभाल दुरुस्तीसाठी शासन वेळोवेळी पैसे देते. तर मग शेतकºयांकडून पाण्यासाठी घेतलेले लाखो रुपये जातात कोठे, असा प्रश्न उपस्थित करून, आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्यामुळेच अधिकारी आणि सत्ताधारी मालामाल झाले असल्याचा आरोप पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर एका जाहीर कार्यक्रमात केला.

आंबोडी ( ता. पुरंदर ) येथे गाव तेथे युवक शाखा मोहीम अंतर्गत कॉंग्रेसच्या युवक शाखेचे उद्घाटन करण्यात जगताप आले होते. त्यावेळी त्यांनी शिवतारे यांच्यावर निशाना साधला. गुंजवनीच्या पाण्याच्या एका सहीसाठी तालुक्यातील जनतेने मंत्रिपद दिले, परंतु साडेचार वर्षात पाणी का आणता आले नाही. तालुक्यात दुष्काळ पडला असताना जे जनतेला स्वच्छ,शुध्द पाणी देवू शकत नाही, ते शेतीला कधी पाणी देणार? असा सवाल उपस्थित करून मला जनतेने निवडून दिल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील शेतीसाठी सहाच महिन्यात बारमाही पाण्याची व्यवस्था केली जाईल असे जाहीर केले. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण युवकचे राज्य सरचिटणीस गणेश जगताप, आंबोडीच्या सरपंच नंदिनी बोरकर, ग्रामपंचायत सदस्या मनिषा बोरकर, तालुका युवक अध्यक्ष सागर मोकाशी, उपाध्यक्ष सुशील शिवरकर, युवती अध्यक्षा रागिणी जाधव, स्वाती होले, ज्ञानेश्वरी जगताप, युवक शाखा अध्यक्ष युवराज बोरकर, माजी सरपंच नवनाथ मोरे, सासवडचे माजी नगराध्यक्ष विजय वढणे, अक्षय भांडवलकर, तुषार बोरकर, दत्तात्रय बोरकर, महेश बोरकर, त्याच प्रमाणे युवक शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच नंदिनी बोरकर यांनी गावात पिण्यास पाणी नसताना आणि त्यांकारचा प्रस्ताव देवूनही पाणी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला. गावातील रस्ते खराब झाल्याचे भाषणातून सांगितले. यावेळी काकासाहेब शिवरकर, स्वप्नील शिवरकर, यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच नवनाथ मोरे यांनी प्रास्ताविक केले, विकास इंदलकर यांनी सूत्रसंचालन केले. यावळी ग्रामस्थ उपस्थित होते.शिवतारेंना पोलीस संरक्षण कशासाठी?४जनतेने शिवतारेना मंत्री केले, पण मंत्री फेसबुक वरून अश्लील शब्दप्रयोग करीत असल्याने त्यांची पातळी जनतेला चांगलीच समजली आहे अशा शब्दात जगताप यांनी समाचार घेतला.४राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्राचे कृषिमंत्री, संरक्षण मंत्री असतानाही शरद पवार यांना जेवढी पोलीस सुरक्षा लागत नाही, त्यापेक्षा जास्त पोलीस घेवून हे महाशय फिरतात, त्यामुळे जनतेत फिरताना आणि स्वत:च्या घरी जाताना शिवतारेना पोलीस संरक्षण का लागते? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :PuneपुणेCorruptionभ्रष्टाचार