शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

कोट्यधीश उमेदवार ८५ टक्के

By admin | Updated: February 9, 2017 03:30 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. या निवडणुकीत उभे राहिलेले ८५ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. या निवडणुकीत उभे राहिलेले ८५ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत, तर उर्वरित उमेदवार लक्षाधीश आहेत. जमिनीला सोन्याचा भाव आल्याने प्रत्येकाच्या घरात आलिशान मोटारी आणि जडजवाहिर असल्याचे त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते.महापालिकेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीचा अर्ज सादर करताना स्थावर आणि जंगम मालमत्तचे विवरण देणे बंधनकारक असते. त्यात यावर्षीपासून उमेदवाराबरोबरच कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न सादर करणे अनिवार्य होते. त्यामुळे घरातील मूळ पुरूष, त्याची पत्नी मुले यांचेही एकत्रित उत्पन्न अनेक उमेदवारांनी सादर केले आहे. त्यात जंगम मालमत्तेत बँक खाती, सेव्हींग करंट खाते, ठेवी, बंधपत्रे यांचा समावेश आहे. तर स्थावर मालमत्तेत जमीन, वडिलोपार्जित जमीन, सदनिका, दुकाने यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सोने, जडजवाहिर, वाहने यांचाही उल्लेख उमेदवारांनी केलेला आहे. तर उमेदवारांवर किती कर्ज, अशा सर्वबाबींचे विवरण प्रतिज्ञापत्रात केले आहे. या निवडणुकीत उभे राहिलेले ८५ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. तर उर्वरित चौदा टक्के उमेदवार हे उमेदवार लक्षाधीश आहेत. उर्वरित उमेदवारांचे उत्पन्न लाखांच्या आत आहे.जमिनीला सोन्याचा भाव आल्याने प्रत्येकाच्या घरात मोटारी आणि जडजवाहिर असल्याचे त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते. महापालिका निवडणुकीसाठी १२८ जागांसाठी १२३८ अर्जांपैकी ४८० जणांनी माघार घेतल्याने ७५८ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. त्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तचे विवरण दिले आहे. (प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टीभाजपाचे नितीन काळजे यांच्याकडे जंगम मालमत्ता ४.३० लाख, ३७.८६ लाख स्थावर मालमत्ता, अशी एकूण ४१ लाख मालमत्ता असून, त्यांच्याकडे ३४ लाखांच्या मोटारी असून कर्ज ३.८९ लाख एवढे आहे. सरिता साने यांचे वार्षिक उत्पन्न २० लाख असून ३.७ कोटींची जंगम आणि ५ .७७ कोटींची स्थावर अशी एकूण ८.१९ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ४७ लाखांच्या मोटारी आहेत. तर छत्तीस लाखांचे कर्ज आहे. बाळासाहेब ओव्हाळ यांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख असून जंगम मालमत्ता ३६ लाख आणि स्थावर मालमत्ता ४ कोटी अश्ी एकुण ४.३९ कोटींची मालमत्ता आहे. कर्ज नाही. बाळासाहेब तरस यांचे वार्षिक उत्पन्न ४८ लाख असून, स्थावर मालमत्ता २४ लाख असून जंगम मालमत्ता ७.३७ कोटी अशी एकुण ७.६१ कोटी उत्पन्न आहे. त्यांच्यावर कर्ज नाही. राजेंद्र गावडे यांचे वार्षिक उत्पन्न ९५ लाख असून जंगम मालमत्ता ७५ लाख, स्थावर ७.८ कोटी अशी एकूण ७.६० कोटींची मालमत्ता असून त्यांच्याकडे ४१ लाखांची वाहने आहे. ३.३१ कोटींचे कर्ज आहे. संदीप वाघेरे यांची जंगम मालमत्ता ७.६९ कोटी आणि स्थावर मालमत्ता ७९.७५ कोटी अशी एकूण ८७.४४ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ३० लाखांचे सोने आणि १.५० कोटींची वाहने आणि त्यांच्यावर ८.५५ कोटींचे कर्ज आहे. धनंजय काळभोर यांच्याकडे जंगम मालमत्ता २.१८ कोटी असून स्थावर मालमत्ता १४.७७ कोटी अशी एकूण १६.९६ कोटी मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ११ लाखांचे सोने ८८ लाखांची वाहने आणि ५० लाखांचे कर्ज आहे. नामदेव ढाके यांचे वार्षिक उत्पन्न १२ लाख असून १ कोटी जंगम आणि ८४ लाख स्थावर मालमत्ता असून एकूण १.८९ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे दहा १० लाखांचे सोने ५० लाखांची वाले आहे. ३३ लाखांचे कर्ज आहे. राजेंद्र किसन लांडगे यांचे एकुण उत्पन्न ९.११ लाख असून जंगम मालमत्ता १.३२ कोटी स्थावर मालमत्ता १.०५ कोटी अशी एकुण २ कोटी ३७ ला असून त्यांच्याकडे ३६ लाखांची वाहने असून १६.३० लाखांचे कर्ज आहे. नितीन लांडगे यांचे वार्षिक उत्पन्न ६.२४ लाख असून जंगम मालमत्ता ५०.८० लाख, स्थावर मालमत्ता ३.६५ कोटी अशी एकुण ४.१६ कोटींची मालमत्ता आहे. तर दहा लाखांचे सोने, २५ लाखांच्या मोटारी आणि त्यांच्यावर ७.८८ लाखांचे कर्ज आहे. सतीश दरेकर यांचे वार्षिक उत्पन्न ६४ लाख असून जंगम मालमत्ता १.१८ कोटी, स्थावर मालमत्ता २७ कोटी अशी एकुण २८.९९ कोटी मालम्ता आहे. ३१ लाखांचे कर्ज आहे. माया बारणे यांचे वार्षिक उत्पन्न ७.९८ लाख असून जंगम मालमत्ता ९१ लाख आणि स्थरावर मालमत्ता ११.५७ कोटी अशी एकुण १२.४५ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ८२ लाखांचे कर्ज आहे. विशाल वाकडकर यांचे वार्षिक उत्पन्न ३३ लाख असून जंगम मालमत्ताा सव्वाचार कोटी, स्थावर मालमत्ता २१ कोटी अशी एकुण २५.७८ कोटी मालमत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षराष्टवादीचे दत्तात्रय साने यांच्याकडे जंगम मालमत्ता १ कोटी ३६ लाख, स्थावर मालमत्ता २० कोटी ९२ लाख अशी एकूण २१ कोटी ९६ लाख असून ६७ लाखांच्या मोटारी ११.९८ लाखांचे कर्ज त्यांच्यावर आहे. विनया तापकीर यांचे वार्षिक उत्पन्न ४.६४ लाख असून जंगम मालमत्ता ९६ लाख आणि स्थावर मालमत्ता २७.३० लाख अशी एकुण १.२३ कोटींची मालमत्ता असून त्यांच्याकडे सोने १० लाखांचे असून २.३५ लाखांचे कर्ज आहे. संजय वाबळे यांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी असून जंगम मालमत्ता १.५५ कोटी तर स्थावर मालमत्ता १२ कोटी १२ लाख अशी एकुण १३.६७ कोटी १७ लाखांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ८९ लाखांची वाहने असून ४.४५ कोटी कर्ज आहे. विक्रांत लांडे यांचे वार्षिक उत्पन्न ७२.५६ लाख असून जंगम मालमत्ता ६.६८ कोटी आणि स्थावर मालमत्ता ३६.७० लाख अशी एकुण ४३.३८ कोटींची मालमत्ता आहे. तर १२ लाखांचे सोने आणि २० लाखाची वाहने आहेत. तर १८.६७ लाखांचे कर्ज त्यांच्यावर आहे. जालिंदर शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न ५.६८ लाख असून जंगम मालमत्ता १७.१८ लाख आणि स्थावर मालमत्ता १.९५ कोटी अशी एकुण २.१२ कोटी असून ६.०० लाखांचे सोने असून ७ लाखांची वाहने त्यांच्याकडे असून २ लाखांचे कर्ज त्यांच्यावर आहे. प्रतिभा भालेराव यांचे वार्षिक उत्पन्न ५.१५ लाख असून जंगम मालमत्ता ७७ लाख, स्थावर मालमत्ता १५ लाख अशी एकण ७८ लाख असे उत्पन्न आहे. त्यांच्याकडे ३.५ लाखांचे सोने आहे. कर्ज आणि वाहने नाहीत. आर. एस. कुमार यांचे वार्षिक उत्पन्न १०.१९ लाख, स्थावर ५८ लाख जंगम ६० लाख अशी १.१८ कोटी एकुण उत्पन्न आहे. त्यांच्याकडे १२ लाखांचे सोने आहे. १५ लाखांची वाहने, ११ लाखांचे कर्ज आहे. शरद मिसाळ यांचे वार्षिक उत्पन्न २२ लाख असून जंगम मालमत्ता १.८२ कोटी आणि स्थावर मालमत्ता १.१४ कोटी अशी एकुण २.९७ कोटी मालमत्ता आहे. तर त्यांच्याकडे १० लाखांची वाहने आहेत. २३ लाखांचे कर्ज आहे. मोरेश्वर भोंडवे यांचे वार्षिक उत्पन्न २७ लाख असून जंगम मालमत्ता ५२ लाख असून स्थावर मालमत्ता १ कोटी अशी एकुण १०.५२ लाख उत्पन्न आहे. त्यांच्याकडे ४.५ लाखांचे सोने कर्ज नाही. भाऊसाहेब भोईर यांचे वार्षिक उत्पन्न ३४ लाख असून जंगम मालमत्ता ३.५१ कोटी, जंगम मालमत्ता २८ कोटी अशी एकुण ३२.३० कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ३० लाखांचे सोने आहे. तर २.३० कोटींची वाहने आहेत. ८१ लाखांचे कर्ज आहे. अपर्णा डोके यांचे वार्षिक उत्पन्न ७.७३ लाख असून जंगम मालमत्ता ५४ लाख, २.४९ कोटी जंगम अशी एकुण ३ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ७ लाख कर्ज आहे. विजय गावडे यांचे वार्षिक उत्पन्न ८.३६ लाख असून जंगम३.९७ कोटी अशी एकुण ३.९७ कोटींची मालमत्ता आहे. तर १६ लाखांचे सोन आहे. त्यांच्यावर कर्ज नाही.शोभा वाल्हेकर यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख असून जंगम मालमत्ता २९ लाख, स्थावर १७ लाख अशी एकुण २ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ३७ लाखांचे कर्ज आहे. प्रभाकर वाघेरे यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख असून जंगम मालमत्ता २८ लाख, स्थावर मालमत्ता ३.७२ कोटी असे एकुण ४.१९ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ६० लाखांचे कर्ज आहे.शिवसेना, काँग्रेस व इतरशिवसेनेत कोट्यधीशांची संख्या कमी आहे. शहरप्रमुख राहुल कलाटे यांचे वार्षिक उत्पन्न ५.७३ लाख असून जंगम मालमत्ता ५.७२ कोटी, स्थावर मालमत्ता ३७ कोटी असून एकुण मालमत्ता ४३ कोटी आहे. त्यांच्यावर सव्वादोन कोटी कर्ज आहे. नीलेश बारणे यांचे वार्षिक उत्पन्न १९ लाख असून जंगम मालमत्ता ५.३१ कोटी आणि स्थावर मालमत्ता ५.८४ कोटी असे एकुण ११ कोटी उत्पन्न असून २७ लाखांचे कर्ज आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांचे वार्षिक उत्पन्न ६.४७ लाख असून जंगम मालमत्ता ९७ लाख तर स्थावर मालमत्ता २.५३ कोटी अशी एकूण ३.५३ कोटींची मालमत्ता असून त्यांच्यावर १२ लाखांचे कर्ज आहे. राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे यांचे वार्षिक उत्पन्न ६.२९ लाख आहे. जंगम मालमत्ता १०.६२ लाख तर स्थावर मालमत्ता २६.१२ लाख असून त्यांच्यावर ६.१३ लाखाचे कर्ज आहे. भाजपाचे राजेंद्र जगताप यांचे वार्षिक उत्पन्न २.४९ लाख असून जंगम मालमत्ता २.३५ कोटी असून, स्थावर मालमत्ता ८.६८ कोटी अशी एकूण ११.३३ कोटी मालमत्ता आहे.