सुपे : बारामती तालुक्याच्या पश्चिम-उत्तर पट्ट्यातील सुपे परिसरातील गावांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्ग खरिपाच्या पिकांना मुकला आहे. आत्ता रब्बीची पिके आॅक्टोंबर हिटमुळे सुकून जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच रब्बी हंगामही रामभरोसे झाला आहे.यापरिसरात पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने अद्यापही काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीला पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने खरिप हंगामातील पिके जळुन गेली. येथील शेतकऱ्यांनी मातीत गाडलेल्या बियाणाचे पैसे झाले नाहीत. त्यामुळे येथील शेतकरी कर्जाच्या ठायीत लोटला गेला आहे. येथील शेतकऱ्यांची शेती पावसाच्या जिवावर अवलंबुन आहे. तसेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर अद्यापही पाऊस नसल्याने आॅक्टोंबर हिटमुळे पिके सुकू लागली आहेत. आॅक्टोंबर हिटमुळे रब्बी हंगामातील पिके सुकू लागल्याने पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर आली आहेत. शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्ज काढुन कर्जाचा डोंगर उभा केला आहे.या परिसरातील शेतकऱ्यांचे दोन्हीहंगाम वाया जाण्याच्या भितीने तसेच सोसायटयांच्या कर्जाने शेतकरीवर्ग चिंत्ताग्रस्त झाला आहे. त्यामुळे या भागात येथे जनावरांच्या छावण्या सुरु कराव्यात.या भागातील ५0 पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून येथे दुष्काळ जाहिर करण्याची मागणी येथील शेतकरीवर्गाने केली आहे.
सुपे परिसरात पिके करपली
By admin | Updated: October 28, 2015 23:48 IST