शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी पिके लागली होरपळू

By admin | Updated: May 1, 2017 02:08 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून विद्युतपंपाच्या विजेचे सलग अठरा तास भारनियमन

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून विद्युतपंपाच्या विजेचे सलग अठरा तास भारनियमन केले जात आहे. भारनियमनाव्यतिरिक्त उपलब्ध असलेली वीजही वारंवार खंडित होत असल्याने विजेचा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय बनू लागला आहे. भीमा नदीला भामा झ्र आसखेड धरणातून तर चासकमान धरणातून डाव्या कालव्याला उन्हाळी आवर्तन सुरु आहे. परंतु विजेअभावी पिकांचे सिंचन करता येत नसल्याने उन्हाळी हंगामातील पिके होरपळून जाऊ लागली आहे. वाढत्या भारनियमना विरोधात शेतकऱ्यांनी रास्तारोकोचा इशारा दिला आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहूळ, कोयाळी-भानोबाची, मोहीतेवाडी, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, नवीनगाव आदि गावांमध्ये मागील दोन महिन्यांपासून विद्युत पंपाच्या विजेचे अठरा तास भारनियमन सुरु आहे. भारनियमन तसेच विजेच्या लपंडावाला बळी पडणारी ही गावे बारमाही पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असून सलग होणाऱ्या भारनियमनामुळे या गावांमधील उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील दोन आठवड्यांपासून भामा आसखेड धरणातून तसेच चासकमान डाव्या कालव्यामार्फत शेतीसाठी पाण्याचे विशेष आवर्तन सुरु आहे. एकीकडे वेळेवर आवर्तन मिळाल्याने घटलेली पाणी पातळी वाढून पाण्याचे स्रोत पुन्हा एकदा भरत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत होते. अशातच वीजेच्या समस्येने डोके वर काढल्याने शेतकरी द्विधावस्थेत सापडू लागला आहे. चालू उन्हाळी हंगामात काहीलींचा चटका जास्त क्षमतेने बसत असल्याने हंगामात पिकांच्या योग्य वाढीसाठी इतर हंगामाच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट पाणी द्यावे लागत आहे. मात्र अठरा तास वीज गायब असल्याने मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही. उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विजेचे भारनियमन रद्द करून अखंडित वीज उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, शरद मोहिते, धैर्यशील पानसरे, एकनाथ आवटे, सुभाष वाडेकर, संतोष आवटे, शशिकांत मोरे, तुषार झरेकर, काळूराम दौंडकर, सजेर्राव मोहिते, पठाणराव वाडेकर, राजाराम साबळे, राजेश म्हस्के, सागर दौडकर, तुषार बवले, श्याम बवले, संतोष साबळे, योगेश मोरे, निखील मोहिते, विशाल दौडकर, भूदेव शिंदे, विनोद चोपडा, सोपान निकम आदींकडून केली जात आहे.ऐन उन्हाळ्याच्या दिवसात १८ तासांहून अधिक काळ होत असलेल्या भारनियमनाचा उन्हाळी हंगामातील शेतपिकांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. विजेचे वेळापत्रक दर आठवड्याला बदलले जात असून एका आठवड्यात दिवसा फक्त सहा तर दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या वेळी वीज दिली जात आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा शिल्लक असतानाही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही. परिणामी ऊस, बाजरी, गवार, मिरची, वाल तसेच पालेभाज्या जळून जात आहेत. पूर्व भागातील गावांमध्ये चासकमान व भामा झ्र आसखेड धरणाचे पाणी उपलब्ध आहे. मात्र महावितरण कंपनीच्या दुपट्टी धोरणामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ घेता येत नाही. वेळेवर वीज बिल भरूनही शेतकऱ्यांना हक्काची वीज मिळत नसेल तर शेतकऱ्यांवर अन्याय आहे. लोकप्रतीनिधींना शेतकऱ्यांच्या समस्येचे काही देणे घेणे नाही. - दिलीप मोहितपाटील, माजी आमदार खेडनित्याच्या अठरा तासांच्या भारनियमनामुळे उन्हाळी हंगामातील पिकांचे सिंचन करता येत नाही. गंभीर बनत चाललेला विजेचा तिढा महावितरण कंपनीनी तात्काळ सोडविला पाहिजे. याविरोधात शेलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेत रास्तारोकोचा ठराव घेऊन आंदोलन केले जाणार आहे. - एकनाथ आवटे, उपसरपंच शेलगावमागील दोन-तीन महिन्यांपासून विजेचा प्रश्न अतिशय बिकट होऊ लागला आहे. दिवसात एका एकराचेही सिंचन होत नसल्याने पिके संकटात येऊ लागली असून आम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनदरबारी पाठपुरावा करूनही आमच्या मागण्या विचारात घेतल्या जात नाहीत.- संतोष साबळे, जिल्हाध्यक्ष माहिती सेवा समितीशेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष....अठरा तासांचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात महावितरण कंपनीकडे शेतकरी वारंवार विनवणी करत आहेत. मात्र कंपनीकडून पूर्ण क्षमतेने वीज देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाय - योजना आखल्या जात नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कडाक्याच्या काहिलीपासून उन्हाळी हंगामातील पिके वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.