शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत आचारसंहिता धुडकावून राजकीय फलक लावल्याने गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 13:11 IST

सर्व फलक हे अनाधिकृत व शासनाची तसेच ग्रामपंचायतची कुठलीही पूर्वपरवानगी नसताना लावण्यात आल्याचे पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

ठळक मुद्देपुरंदर तालुक्यात आज हा गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय

जेजुरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जाहीर झाल्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या कामाला लागली आहे. परंतु, अजूनही काही ठिकाणी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे काही गावात मात्र याबाबत कमालीचे दुर्लक्ष केले जाते याचाच परिणाम गावातील राजकीय वाद -विवाद यावर दिसून येतो. जेजुरी पोलीस ठाण्यात राजकीय पुढाºयांचे फलक लावण्याच्या कारणावरून पोलीस ठाण्यात मंगळवारी दि. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  राजेंद्र किसन कुंजीर (रा. वाघापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. नव्याने सुरू झालेल्या हॉटेल संस्कृती या व्यावसायिक दुकानाचे उद्घाटन समारंभ निमित्त येथील परिसरात राजकीय पुढाऱ्यांचे फोटो असलेले फलक लावण्यात आले होते. यामुळे आचारसंहितेचा भंग होऊन राजकीय वाद निर्माण होईल अशी वाघापूर ग्रामपंचायतीला भीती वाटली. यानंतर ग्रामपंचायत शिपाई राजेंद्र कुंजीर यांनी हे बोर्ड व बॅनर्स तात्काळ काढून घेणे बाबत हॉटेल व्यावसायिकास सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून हॉटेल मालक राहुल अशोक कोलते (रा शिंदेवाडी,ता. हवेली) याने कर्मचाऱ्याला मारहाण केली.यानंतर येथील गाव कामगार तलाठी विश्वास आटोळे ग्रामसेविका श्रीमती विजया भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबत पोलिसांना माहिती कळवली येथील लावण्यात आलेले सर्व फलक हे अनाधिकृत व शासनाची तसेच ग्रामपंचायतची कुठलीही पूर्वपरवानगी नसताना लावण्यात आल्याचे पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी राहुल कोलते यास अटक करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे निवडणुकीच्या कालावधीत सर्व राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा आदर करावा अशी माहिती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली

टॅग्स :JejuriजेजुरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणElectionनिवडणूक