शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

२० हजारांंच्या कर्जाचे ४ हजार रुपये व्याज, बेकायदा सावकारी व्यवसायप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:30 IST

२० हजार रुपयांचे दरमहा २० टक्के दराने दरमहा ४ हजार रुपये व्याज वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बारामती  - २० हजार रुपयांचे दरमहा २० टक्के दराने दरमहा ४ हजार रुपये व्याज वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० हजार रुपये बेकायदा व्याजाने देऊन २० टक्के व्याजाने वसुली केल्याची तक्रार बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या डोर्लेवाडी येथील १५ जणांवर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय रघुनाथ गंधारे (वय ४२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी बेबट्या अज्या भेसले, अज्या भेसले, चैत्री अज्या भेसले, दत्या भोसले, विज्या भोसले, अकबºया भासेले, सागर भोसले, अश्विनी बेमट्या भोसले, सुनीता दत्या भोसले, मर्दानी अकबºया भोसले, पूजा सागर भोसले, पोर्णिमा विज्या भेसले, मीना अमोल काळे, करण जक्कल पवार, नीलम करण पवार (सर्व रा. झारगडवाडी, बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२० मार्च ते १९ सप्टेंबर २०१८ दुपारी २ वाजेपर्यंत न्यू इंग्लिश स्कूलसमारे, फिर्यादीच्या घरात गुन्हा घडला. आरोपी बेबट्या भोसले, अज्या भोसले, चैत्री भोसले यांनी फिर्यादीस २० हजार रुपये दरमहा १० टक्के दराने बेकायदेशीर व्याजाने दिले. सर्व आरोपींनी फिर्यादीचे घरासमोर येऊन गोंधळ घालून १० टक्के ऐवजी २० टक्केप्रमाणे दरमहा ४००० घेतले. घराबाहेर येऊन फिर्यादी व फिर्यादीचे कुटुंबातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे करीत आहेत.फिर्यादीचे घरात घुसून फिर्यादी, फिर्यादीचे घरातील लोकांना पकडून हाताने लाथांनी मारहाण केली. फिर्यादीचे शर्टच्या खिशातील ५००० रु., पॅन्टच्या उजव्या खिशातील फिर्यादीच्या दुचाकीची चावी व डाव्या खिशातील दुचाकीची कागदप़त्रे असे जबरदस्तीने घेऊन गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnewsबातम्या