पुणे : व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणा-या नोकराने तिजोरीचे कुलुप बनावट चावीने उघडून १ लाख ६४ हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत रामचंद्र मदने (वय ३३,रा. प्रभात रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी शिवाजी गळीप (वय २९,रा. माण, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदने यांचे शिवाजीनगर भागातील एका इमारतीत कार्यालय आहे. आरोपी गळीप त्यांच्याकडे कामाला होता. गळीपने कार्यालयातील तिजोरी बनावट चावीने उघडली. तिजोरीतील १ लाख ६४ हजारांची रोकड लांबवून तो पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.
---