शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

पुण्यातील वैशाली हॉटेलच्या जगन्नाथ शेट्टींविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 15, 2017 01:44 IST

फर्ग्युसन महाविद्यालय मार्गावरील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे चालक जगन्नाथ शेट्टी यांच्याविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय मार्गावरील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे चालक जगन्नाथ शेट्टी यांच्याविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलच्या परवान्यात फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप शेट्टी यांच्या मेहुणीने केला होता. शशिकला श्रीराम शेट्टी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १९४५ ते १९५० या कालावधीत वडील श्रीधर शेट्टी यांनी निर्मल भवन, मद्रास कॅफे (रूपाली), मद्रास हेल्थ होम (वैशाली) ही तीन हॉटेल सुरू केली. सात वर्षांची असताना वडिलांचे आकस्मिक निधन झाले. त्यावेळी आत्याचा मुलगा जगन्नाथ हा हॉटेलमध्ये कामाला होता. अशिक्षित आईचा जगन्नाथ यांनी गैरफायदा घेतला. गोड बोलून आत्याचा विश्वास संपादन केला. बहीण शकुंतला हिच्याशी त्यांनी विवाह केला. घरात कुणी कर्ती व्यक्ती नसल्याने जगन्नाथ यांनी हॉटेल व्यवसायाची सूत्रे ताब्यात घेतली. त्यांनी त्यांचा मामेभाऊ शशेंद्र याला हॉटेलमध्ये कामाला लावले. मिळणारा नफा आई आणि तीन बहिणींना देण्याचे जगन्नाथ यांनी कबूल केले होते. माझा मुलगा सलील याने हॉटेल रूपालीचा पुढील कारभार पाहाण्यासाठी चर्चा सुरू केली असता शशेंद्र याने अडथळा निर्माण करीत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. जगन्नाथ यांच्या वडिलांचे नाव बाबू नसतानाही त्यांनी हॉटेल तसेच पोलीस परवान्यावर जे. बी. शेट्टी असा नावात फेरफार केला. शशेंद्र याने हॉटेल रूपालीच्या परवान्यावर स्वत:चे नाव लिहिले. वडिलांनी कष्टाने उभा केलेला व्यवसाय आणि संपत्ती हडपण्याचा प्रयत्न दोघे करीत आहेत. शशेंद्र सुंदर शेट्टी यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)