पिंपरी : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे एकनाथ पवार व अपक्ष उमेदवार प्रकाश चव्हाण यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय नाईक-पाटील यांनी दिलेली माहिती अशी : भाजपचे एकनाथ पवार यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या फेरीत दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक दुचाकी व चारचाकी वाहने आणली होती. यामुळे पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर प्रकाश चव्हाण यांनीही शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निगडी ते पिंपरी फेरी काढण्यात आली होती. या फेरीसाठी कसलीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे चव्हाण यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
एकनाथ पवार यांच्यावर गुन्हा
By admin | Updated: September 29, 2014 05:50 IST