शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

लहानपणापासून क्रिकेटची आवड

By admin | Updated: March 29, 2015 00:28 IST

वयाच्या १४व्या वर्षापासून मला क्रिकेट या खेळाची आवड निर्माण झाली. क्रिकेट क्लब होता, तिथे मुले क्रिकेट खेळायला येत असत आणि मी त्यांचा खेळ पाहत बसायचो.

पुणे : वयाच्या १४व्या वर्षापासून मला क्रिकेट या खेळाची आवड निर्माण झाली. क्रिकेट क्लब होता, तिथे मुले क्रिकेट खेळायला येत असत आणि मी त्यांचा खेळ पाहत बसायचो. असेच काही दिवस गेले. मग ते मला फिल्डिंग करायला सांगायचे, अशाप्रकारे माझ्या मनात क्रिकेटविषयी गोडी वाढत गेली आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, अशा आठवणी माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी सांगितल्या.राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र प्रकाशित, ब्रेल जागृती मराठी ब्रेल त्रैमासिक आयोजित दृष्टिहीन नागरिकांसाठी बोर्डे यांच्या मुलाखतीचे शनिवारी आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रीय दृष्टिहीन महाराष्ट्र संघाचे महादेव गुरव, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सचिव प्रकाश पंडागळे, उपाध्यक्ष राजीव हरिभगत, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ पुणे विभागाचे बाबासाहेब राऊत आदी उपस्थित होते.मुलाखतीमध्ये बोर्डे यांच्या घरची परिस्थिती, त्यांना त्यांच्या घरातून मिळालेले खेळासाठीचे प्रोत्साहन, कोणते सामने जिंकले, कोणते हारले, क्रिकेट हा खेळ पैशासाठी कधी खेळलो नाही, आवड होती म्हणून खेळलो, चंदू बोर्डे हे नाव जगभर कसे झाले, सोळाशे धावा करणारा एकमेव भारतीय म्हणून बोर्डे यांची ओळख, इंग्लंडमध्ये जेव्हा त्यांनी क्रिकेटचा सामना खेळला, तेव्हा त्यांना उपाधी कशी मिळाली, यांसारखे अनेक गमतीदार आणि थरारक किस्से या मुलाखतीतून उलगडत गेले. मुलाखतीनंतर बोर्डे यांनी उपस्थितांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. (प्रतिनिधी) ४बोर्डे यांनी एक मजेदार किस्सा सांगितला. सुरुवातीच्या काळात त्यांची क्रिकेट खेळाला नुकतीच सुरुवात झाली होती. त्या दरम्यान त्यांनी एक सामना खेळला. त्या सामन्यात त्यांनी १०६ धावा केल्या होत्या. तेव्हा त्यांना मैदानावरील लोकांनी उचलून घेतले. त्यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा होते. नंतर आमच्या भेटी वाढत गेल्या, अशी आठवण त्यांनी सांगितली.