शिरुर येथील आदित्य पतसंस्थेचा १५ वा वर्धापनदिन व पतसंस्थेच्या स्वमालकीच्या रेव्हेन्यू कॉलनी बी-स्क्वेअर या नवीन जागेत स्थलांतर सोहळा उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. शिरुर शहरात आदित्य पतसंस्थेने बॅँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता जपण्याचे काम केले
आहे. पुढील काळातही संस्थेची प्रगती होईल, असा विश्वास व्यक्त करत काळानुसार विविध सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना या वेळी त्यांनी दिल्या. व्यवस्थापक प्रवीण पेटकर यांनी पतसंस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष विनोद धाडिवाल यांनी केले. या वेळी पतसंस्थेचे संचालक नितीन देशमाने, व्यावसायिक प्रकाश बाफना, सुनील धाडिवाल, सतीश संघवी, अजित संघवी, उदय पाचंगे, डॉ. जयंत लंके, माजी नगरसेवक प्रकाश धाडिवाल, विजय धाडिवाल, मदन पिपाडा, विलासशेठ कर्नावट, राजेंद्र कोठारी,उदय पाचंगे, बाबूराव पाचंगे आदी उपस्थित होते.
फोटो आहे :