शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Covid Vaccination For 15 to 18 Age Group: सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 19:06 IST

लस केवळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्येच उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, पुणे शहरात ३ जानेवारीपासून (सोमवार) महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात येत आहे. या वयोगटातील मुलांना प्रथमच लस दिली जात असल्याने, ही लस केवळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्येच उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयासह प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील दवाखान्यांमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत होणार आहे. या सर्वांना केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली असून, ४० दवाखान्यांमध्ये प्रत्येकी २५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणीव्दारे तर ५० टक्के लस ही लसीकरण केंद्रांवर उपस्थित असलेल्यांना ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून देण्यात येणार आहे.              १४४ ठिकाणी कोव्हिशिल्ड लस

१८ वर्षांपुढील वयोगटाला शहरातील १४४ लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ५ टक्के लस ऑनलाईन बुकिंगव्दारे व ५ टक्के लस ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून देण्यात येणार आहे. तर ११ ऑक्टोबरपूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांना ४५ टक्के लस ऑनलाईन बुकिंगव्दारे व ४५ टक्के लस ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस देण्यात येणार आहे. याचबरोबर १८ वर्षांपुढील नागरिकांना ससूनसह ११ दवाखान्यांमध्ये कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांनी ७ डिसेंबर पूर्वी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशांना दुसरा डोसही याठिकाणी उपलब्ध राहणार आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरMayorमहापौर