शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात होणार ‘अवकाश विज्ञाना’वर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 19:24 IST

देशभरातील अवकाश विज्ञानातील नामवंत संस्था व संशोधकांचा समावेश असलेली ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’ ही राष्ट्रीय परिषद जानेवारी महिन्यात पुण्यात होणार आहे.

ठळक मुद्देयापूर्वी डिसेंबर १९८३ मध्ये विद्यापीठात या परिषदेचे आयोजनदेशभरातील सर्व महत्त्वाच्या संस्थांचे तसेच, विद्यापीठांचे सुमारे ५०० ते ६०० प्रतिनिधी सहभाग

पुणे : देशभरातील अवकाश विज्ञानातील नामवंत संस्था व संशोधकांचा समावेश असलेली ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’ ही राष्ट्रीय परिषद जानेवारी महिन्यात पुण्यात होणार आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाला परिषदेचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, नव संशोधक, अवकाश प्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. विद्यापीठामध्ये दि. २९ ते ३१ जानेवारी यादरम्यान ही परिषद होणार आहे. यापूर्वी डिसेंबर १९८३ मध्ये विद्यापीठात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद दर दोन-तीन वर्षांनी भरवण्यात येते. त्यात अवकाश विज्ञानाशी संबंधित सर्व मुद्द्यांबाबत चर्चा होते. देशभरातील सर्व महत्त्वाच्या संस्थांचे तसेच, विद्यापीठांचे सुमारे ५०० ते ६०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यापूर्वीची परिषद केरळमधील थिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस रीसर्च सेंटरमध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये पार पडली होती, अशी माहिती विद्यापीठातील वातावरण व अककाश विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी. प्रदीप कुमार यांनी दिली.परिषदेतील एकूण सहभागी संशोधकांपैकी एक तृतियांश संशोधक ‘इस्रो’मधील असतात. त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी इतर संस्थांमधील संशोधकांना उपलब्ध होते. अवकाश विज्ञानातील भविष्यातील दिशा आणि उपक्रमांबाबत माहिती करून घेण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरते. ही परिषद भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) प्रायोजित करण्यात येते. पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (आयुका) आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स (एनसीआर.ए) या संस्था परिषदेचे सहआयोजक असतील. या संस्थांसह परिषदेमध्ये फिजिकल रीसर्च लॅबोरेटरी (अहमदाबाद), नॅशनल अटमॉस्फेरिक रीसर्च लॅबोरेटरी (आंध्र प्रदेश), स्पेस अप्लिकेशन सेंटर (अहमदाबाद), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जीओमॅग्नेटिझम (पनवेल), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अस्ट्रोफिजिक्स (बंगळुरू), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी (पुणे), स्पेस फिजिकल लॅबोरेटरी (थिरूअनंतपूरम) या संस्थांमधील संशोधक सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठscienceविज्ञान