शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमातील एखाद्या दृश्याप्रमाणे कॉलेजच्या तरुणीचा हात धरणा-याला न्यायालय म्हणते सुधर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:56 IST

सिनेमातील एखाद्या दृश्याप्रमाणे कॉलेजच्या तरुणीचा भर रस्त्यात हात धरून माझ्यावर प्रेम करशील का, अशी प्रेमाची हाक देणा-या तरुणाला न्यायालयाने दोन वर्षांच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका करीत दिलासा दिला आहे.

पुणे : सिनेमातील एखाद्या दृश्याप्रमाणे कॉलेजच्या तरुणीचा भर रस्त्यात हात धरून माझ्यावर प्रेम करशील का, अशी प्रेमाची हाक देणा-या तरुणाला न्यायालयाने दोन वर्षांच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका करीत दिलासा दिला आहे. विनयभंगाच्या खटल्यामध्ये आरोपीला शिक्षा देण्याऐवजी न्यायालयाने त्याचे वय लक्षात घेऊन कायद्यातील प्रोबेशन आॅफ आॅफेन्डर अ‍ॅक्टनुसार त्याला सुधारण्याची संधी दिली.न्यायालयाने त्याला तीन हजार रुपयांच्या बॉण्डवर चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर दोन वर्षांसाठी त्याची सुटका केली. दोन वर्षांच्या कालावधीत तो चांगला वागला नाही तर त्याला विनयभंगाच्या आणि बाललैंगिक प्रतिंबंधक कायदाच्या कलमानुसार पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातून येरवड्यातील २१ वर्षीय तरुणाची सुटका करण्यात आली आहे. जानेवारी २०१६मध्ये ही घटना घडली. येरवडा पोलिसांकडे दाखल फिर्यादीमध्ये, अल्पवयीन असलेली १७ वर्षांची मुलगी कॉलेजला निघाली होती. त्यावेळी तरूणाने तिचा पाठलाग केला. तिचा हात धरुन तुला सुखात ठेवेन माझ्याशी प्रेम करतेस का, अशी विचारणा केली, असे फिर्यादीत म्हटले होते. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी या खटल्यात काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय