शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातील साफसफाई आता आउटसोर्सिंगद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 04:29 IST

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील सफाईचे काम करण्यासाठी अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे आता हे काम १ आॅगस्टपासून आउटसोर्सच्या माध्यमातून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील सफाईचे काम करण्यासाठी अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे आता हे काम १ आॅगस्टपासून आउटसोर्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे़ पुणे बार असोसिएशनने याबाबत अनेकदा तक्रारी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे़ न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडी असून त्यामुळे दररोज पालापाचोळ्याचा कचरा साठतो़ त्यात पाऊस सुरू असल्याने हा पालापाचोळा कुजतो व त्याचा वास परिसरात येत राहतो़ अस्वच्छतेमुळे न्यायालयात येणारे पक्षकार, वकील आणि न्यायिक अधिकाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. न्यायालयाच्या आवारातील भिंती आणि पायऱ्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसतात. आवारात कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या उपलब्ध नाहीत. न्यायालयात न्याय मिळण्याच्या अपेक्षेने येणाऱ्या पक्षकारांसाठी येथे पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची अडचण, आवारात बसण्यासाठी चांगली सुविधा नाही. कचरा आणि घाणीचे साम्राज्य, अस्वच्छ स्वच्छतागृहे, त्यातून येणारी दुर्गंधी यामुळे न्यायालयाच्या हॉलबाहेरही पक्षकारांना नाक दाबून थांबावे लागते. महिला पक्षकारांचीही स्वच्छतागृहे स्वच्छ नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. न्यायालयात वेळेवर सफाई होत नाही. त्यामुळे ही कामे आउटसोर्सच्या माध्यमातून करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ राजेंद्र दौंडकर यांनी सांगितले़ गुरुवारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा न्यायालयात आले़ त्यांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता केली़ यापूर्वी न्यायालयातील साफसफाई आउटसोर्समार्फत केली जात असे़ परंतु, ज्या कंपनीकडे याचा ठेका होता़, ते जेवढे कर्मचारी कामावर आहेत़, त्यापेक्षा अधिक कर्मचारी कामावर असल्याचे दाखविले जात होते़ त्यामुळे त्यांच्याकडून सहा महिन्यांपूर्वी हे काम काढून घेण्यात आले होते़ जिल्हा न्यायाधीश एस. एन. मोडक यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी न्याय व विधी विभागाकडे पुन्हा पाठपुरावा करून नवीन टेंडर मंजूर करून घेतले़ त्यामुळे आता नव्या कंपनीकडे काम देण्यात आले आहे. - अ‍ॅड़ राजेंद्र दौंडकर, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन