पुणे : पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि मदतीसाठी दोरी पकडून उभे असलेले नागरिक अशा स्थितीत पाठीवर एका लहान मुलाला घेऊन दुर्घटनाग्रस्तांची मदत करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी नीलिमा गायकवाड या सोशल मीडियावर हिट झाल्या. आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय कार्याची सर्वत्र चर्चा आहे. पोलीस आयुक्तांनी देखील टिष्ट्वट करून गायकवाड यांच्या धाडसाचे कौतुक केले. तसेच या ठिकाणी दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई संतोष सूर्यवंशी यांनी देखील प्रसंगावधान दाखवत ११ महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचवले. याबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच आम्ही तत्काळ त्या ठिकाणी गेलो.
त्या साहसी महिला पोलिसाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 03:43 IST