शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कात्रज घाटात चोरट्यांनी तीक्ष्ण शस्त्राच्या धाकाने दाम्पत्याला लुटले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 16:23 IST

कात्रज घाटात तपासणी नाक्याजवळ वेगवेगळ्या दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी मोटार थांबवून शास्राचा धाक दाखवत दाम्पत्याला लुटले.

पुणे : मोटारीतून निघालेल्या दाम्पत्याला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा दोन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी भारती विद्याापीठ पोलिसांकडून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप शिवराम भोसले (वय ५२,रा.विंझर, ता.वेल्हा, भोर) यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले राज्य परिवहन महामंडळात वाहक आहेत. भोसले दाम्पत्य कामानिमित्त पुण्यात आले होते. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास भोसले दाम्पत्य मोटारीतून गावी निघाले होते. कात्रज घाटात तपासणी नाक्याजवळ वेगवेगळ्या दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी मोटार थांबविली. भोसले आणि त्यांची पत्नी जयश्री यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. जयश्री यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, भोसले यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड, राज्य परिवहन मंडळाचा वाहक परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड असा माल लुटून चोरटे फरार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या भोसले दाम्पत्याने भारती विद्याापीठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. लुटमारीत पाच चोरटयांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी घटनास्थळी भेट दिली.  पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.