पुणे : महापालिका सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमावेळी गहाळ झालेल्या फेट्यांची सुमारे ५० हजार रुपयांच्या रकमेला स्थायी समितीने मंजुरी दिली होती. मात्र, पुणेकरांनी विरोध केल्यानंतर ही रक्कम नगरसेवकांच्या मानधनातून जमा करण्याचे आदेश महापौर चंचला कोद्रे यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या निर्णयाला आज विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत १७ जानेवारीला झाला. मान्यवरांच्या सत्कारासाठी २०० फेटे भाड्याने आणले होते. त्यापैकी ९० फेटे गहाळ झाले होते. गहाळ फेट्यांची सुमारे ४९ हजार ५०० रुपयांची रक्कम ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने गुपचूप मान्य केला. ‘लोकमत’ने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर महापौर कोद्रे यांनी ही रक्कम नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्याचे पत्र आयुक्तांना दिले होते. (प्रतिनिधी)
फेट्यांची रक्कम मानधनातून देण्यास नगरसेवकांचा नकार
By admin | Updated: June 17, 2014 02:14 IST