शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कॉसमॉस बँक फसवणूक प्रकरण: ७१ बँका, ४१ शहरांतून काढले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:27 IST

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून दरोडा प्रकरणात देशातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली असून, या ४१ शहरांतील ८ ते १० एटीएममधून पैसे काढले गेले आहेत़

पुणे : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून दरोडा प्रकरणात देशातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली असून, या ४१ शहरांतील ८ ते १० एटीएममधून पैसे काढले गेले आहेत़ त्याची संपूर्ण टेक्निकल माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे़ अडीच हजार व्यवहारांद्वारे देशातील विविध एटीएममधून सुमारे अडीच कोटी रुपये काढण्यात आले आहेत़ त्याची डाटा गोळा करण्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे असल्याने त्याला वेळ लागत आहे़या प्रकरणात राज्यातील अनेक एटीएममधून प्रत्यक्षपणे पैसे काढण्यात आले असून, तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचा तपास करण्यावर विशेष तपासाने लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी दिली़कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करुन ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटून नेण्यात आले़ या प्रकरणी पुणे पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे़ या पथकाने कॉसमॉस बँकेकडून ज्या ज्या शहरातील एटीएममधून पैसे काढण्यात आले़ त्या ठिकाणच्या एटीएमची माहिती मागविली आहे़ याबाबत ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले की, बँकेकडून आम्हाला पुणे, मुंबई, कोल्हापूर, इंदौर, मुंब्रा येथील एटीएममधून पैसे काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ मात्र, त्यातही या शहरातील नेमके कोणत्या एटीएममधून हे पैसे काढले गेले, याची सविस्तर माहिती आम्ही मागविली आहे़ त्यादृष्टीने काही एटीएमच्या नेमक्या ठिकाणाची माहिती मिळाली आहे़ त्या एटीएममधील सीसीटीव्ही चे फुटेज शोधण्याचे काम सुरु असून ते फुटेज सुपर इम्पोझ करुन त्याची तपासणी करीत आहेत़ त्याचवेळी संबंधितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असून ते पैसे बँकेच्या खातेदारानेच काढले की परस्पर दुसऱ्याने काढले याची शहानिशा करण्यात येत आहे़कॉसमॉस बँकेकडून आणखी टेक्निकल डाटा मागविण्यात आला आहे़ एटीएम मधील केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले असतात़ त्यावरुन काढण्यात येतात़ मात्र, ते काहीसे अंधुक असतात़ याशिवाय एटीएम मशीन पैसे काढले जात असताना एक स्किन शॉर्ट घेते़ त्यामध्ये अधिक चांगली प्रतिमा येत असते़ ज्या एटीएम मशीनमधून पैसे काढले गेले आहेत़ त्यांचा स्क्रीनशॉटही मागविण्यात येत आहे़

टॅग्स :bankबँकcyber crimeसायबर क्राइम