शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कॉसमॉस बँक सायबर हल्ला: ९४ कोटींना गंडा, चौघे पोलिसांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 01:48 IST

कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लांबविल्याप्रकरणी औरंगाबाद आणि नांदेड येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे.

पुणे : कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लांबविल्याप्रकरणी औरंगाबाद आणि नांदेड येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी दिले.शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. आयेशा मस्जिदजवळ) मिर्झा कॉलनी औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणात यापूर्वी फहिम मेहफुज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्प्लेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. सीमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींनी कट करून हा गुन्हा केला आहे. बँकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने वेगवेगळ्या भागातील आरोपी कोल्हापूर येथे आले होेते. त्यांनी पैसे काढण्यासाठी ९५ क्लोन एटीएम कार्डचा वापर केला आहे. जब्बार आणि राठोड यांनी किती रक्कम काढली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच यापूर्वी अटक आरोपींनी दिलेल्या माहितीवरून जब्बार आणि राठोड यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटल्याची घटना ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान झाली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रांतून काढण्यात आली आहे. यात ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहार करण्यात आले आहेत. तर, १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत. मुंबई, इंदूर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली.मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरुन ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीवरुन केलेल्या तपासात अटक केलेल्या आरोपींनी पाच साथीदारांच्या मदतीने काढल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३ लाख ५५ हजार रुपये जप्त केले आहेत.सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आरोपीआतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी तपासामध्ये मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांना राज्यातील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. आरोपींनी बनावट कार्ड कोठे तयार केली, त्यांना त्याचे साहित्य कोणी पुरविले, आरोपींनी कॉसमॉस बँकेचा डाटा कसा मिळविला, बँकेचे सर्व्हर हॅक होणार याची माहिती कशी मिळाली, संबंधित गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असल्याने याचा शोध घेण्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सायबर क्राईम विभागाच्या गुन्हे शाखेने केली होती.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र