शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कॉसमॉस बॅक फसवणूक: पोलिसांकडून सुरक्षा आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 05:43 IST

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन केलेल्या सायबर दरोडा प्रकरणी बँकेकडून सुरक्षा आॅडिट केले जात आहे. 

पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन केलेल्या सायबर दरोडा प्रकरणी बँकेकडून सुरक्षा आॅडिट केले जात आहे. पोलिसांकडूनही स्वतंत्र सुरक्षा आॅडिट करण्यात येणार असून त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले.आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन परदेशातून व्हिसा तर देशातील अनेक शहरांमधून क्लोन केलेल्या रुपे कार्ड मार्फत विविध खात्यांमधून पंधरा हजारांहून अधिक व्यवहारांद्वारे सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला होता. त्यात रुपे कार्डमार्फत देशातील ४१ शहरांमधून ७१ वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून अडीच कोटी रुपये काढले गेले आहेत़ज्योतिप्रिया सिंह यांनी सांगितले, देशातील ज्या एटीएममधून पैसे काढण्यात आले़ त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरु असून त्यापैकी निम्म्या एटीएमचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे़ महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे आणि नवी मुंबई येथील एटीएममधून पैसे काढण्याचे समोर आले आहे. सर्वाधिक पैसे कोल्हापूर व मुंबई येथून काढण्यात आले आहेत. आता त्यात दिसणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष खातेदारच आहे की दुसरी आहे, याची खातरजमा करण्याचे काम सुरु आहे़ परदेशातील कोणत्या देशातून व कोणत्या बँकेच्या एटीएममधील पैसे काढण्यात आले, याची माहिती व्हिसा कंपनीकडून मागविण्यात आली आहे़

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँक