शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुधारगृहात तोडफोड; ३८ महिलांचे पलायन

By admin | Updated: December 9, 2015 07:41 IST

महमंदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशन या महिला सुधारगृहात राहणाऱ्या ३८ महिलांनी तोडफोड करून पलायन केले़ ही घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घडली़

हडपसर : महमंदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशन या महिला सुधारगृहात राहणाऱ्या ३८ महिलांनी तोडफोड करून पलायन केले़ ही घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घडली़ याबाबतची माहिती अशी : वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलेल्या तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याचे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम ही संस्था करते़ या संस्थेच्या सुधारगृहात सध्या ५६ महिला आहेत़ या संस्थेतून सोमवारी ९ महिला पळून गेल्या होत्या़ त्याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे़ मंगळवारी रात्री महिलांनी संस्थेच्या कार्यालयात प्रवेश करून तेथील कॉम्प्युटर फोडला़ टेबलखुर्च्यांची तोडफोड केली़ कार्यालयालगतच्या खोलीतील साहित्याची तोडफोड केली़ त्यानंतर ३८ महिला पळून गेल्या़ ही माहिती मिळताच वानवडी, हडपसर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली़ त्यात ८ महिला पुलगेट येथे सापडल्या असून, हडपसरमध्ये आणखी १० महिलांना पकडण्यात आले आहे़ या महिलांपैकी काही जणी ३ वर्षांपासून या संस्थेत आहेत. काही जणींना त्यांच्या नातेवाइकांकडे सोपविण्याची आॅर्डर आली असतानाही सोडण्यात येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे़याप्रकरणी रेस्क्यू फाउंडेशनच्या सुपरिंटेंड शायनी पडियार म्हणाल्या, ‘‘काही तरी जळण्याचा वास आला, म्हणून येथे असणाऱ्या मावशी मुलींच्या खोलीत गेल्या़ त्यांना ढकलून त्या महिला बाहेर पडल्या़ त्यांनी कॉटचे पाईप काढून तोडफोड केली़ सुरक्षारक्षकाला ढकलून देऊन त्या पळून गेल्या़’’ (प्रतिनिधी)