शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

‘स्मार्ट सिटी’वर नगरसेवकांचे टीकास्त्र

By admin | Updated: July 21, 2015 09:11 IST

शहर स्मार्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या मूलभूत प्रश्नांवर पुणे महापालिकेच्या

पुणे : शहर स्मार्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या मूलभूत प्रश्नांवर पुणे महापालिकेच्या वतीने त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे चित्र नगरसेवक, अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सूचनांमधून पुढे आले. या ३ गोष्टींवर पालिकेने व्यवस्थित काम केले, तर पुणे शहर आपोआपच स्मार्ट सिटी होईल,असे मत या सर्वांनी व्यक्त केले.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी व अमृत अभियान योजनेची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या वतीने यशदा येथे आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे तसेच स्मार्ट सिटी योजनेचे दिल्ली येथील तांत्रिक अधिकारी मेहताब या वेळी व्यासपीठावर होते. बहुसंख्य नगरसेवकांनी या वेळी शहर स्मार्ट होण्यासाठी महापालिकेने कचरा, सार्वजनिक वाहतूक व पाण्याचा पुनर्वापर याव्ांर नियोजनबद्ध काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवकांबरोबरच मनपा अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही कार्यशाळेला उपस्थित होते. त्यांनीही शहरातील सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर टीका करून तीत सुधारणा होण्याची गरज असल्याचे सांगितले.कार्यशाळेच्या सुरुवातीला आयुक्त कुणाल कुमार यांनी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या, तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या काही योजनांचे सादरीकरण केले. स्मार्ट सिटीसाठी काय करता येईल, त्यासाठीच्या अटी पूर्ण करण्यासाठी महापालिकेला काय करावे लागेल, याविषयी त्यांनी सांगितले. त्यानंतर या योजनेचे केंद्रातील अधिकारी मेहताब यांनी स्मार्ट सिटी व अमृत योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेसाठी देशातून फक्त १०० शहरांची निवड करण्यात येणार असून, त्यांत महाराष्ट्रातील १० शहरे आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे काय याबरोबरच केंद्र सरकारच्या या योजनेतून कशा प्रकारची मदत मिळेल, त्यासाठी कोणत्या अटी व नियम आहेत, याबाबत मेहताब यांनी सांगितले.पुणे शहर स्मार्ट होतेच; मात्र लोकसंख्यावाढीला अनुसरून नागरी सुविधा देण्यात मनपाला अपयश आल्यामुळेच ते आता बकाल होत चालले आहे, अशी टीका विशाल तांबे, अविनाश बागवे यांनी केली. वनिता वागस्कर यांनी विकास आराखड्याचे काय झाले, त्यातील अनेक गोष्टी स्मार्ट सिटी योजनेत घेता येतील, असे सुचवले. स्मार्ट शहरातील वाहतूकही स्मार्ट हवी, त्यासाठी काय उपाय करणार ते सांगा, अशी मागणी पुष्पा कनोजिया यांनी केली. माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या गाड्यांचा रंग बदलला तरी शहर स्मार्ट दिसेल, अशी टीका केली. माधुरी सहस्रबुद्धे, मीनल सरोदे, कैलास गायकवाड, विकास दागंट, किशोर शिंदे आदी नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला व विविध सूचना केल्या. गटनेते गणेश बिडकर, बाबू वागस्कर, सभागृह नेते बंडू केमसे यांनीही मत व्यक्त केले. उपमहापौर आबा बागुल यांनी केंद्र सरकारच्या पहिल्या यादीत पुणे शहराचा समावेश झाला पाहिजेत, अशा पद्धतीने आपली प्रवेशिका प्रशासनाने दाखल करावी, अशी सूचना केली. म्महापौर धनकवडे यांनी कार्यशाळेचा समारोप केला. सुरेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.