शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Coronavirus : 'त्यांनी' सांगितले परभणी आणि 'यांनी' ऐकले जर्मनी अन् झाला ना भाऊ गोंधळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 15:42 IST

ज्यावेळी ‘ध’चा ‘म’ होतो आणि त्यानंतर कशी फजिती होते हे वेगळे सांगायला नको..

ठळक मुद्दे आकुर्डीतील ‘ऐश्वर्यम’सोसायटीमधील रहिवाशांची उडाली झोप.. 

शीतल मुंडे - पिंपरी : प्रत्येकाच्या मनात सध्या कोरोना या महाभयंकर संकटाबद्दल प्रचंड धाकधूक आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कोरोनाने सगळयांचं आयुष्य व्यापलेलं आहे. परदेशातून येणाऱ्या माणसांची प्रशासन आणि आरोग्य विभाग, सोसायट्या, नातेवाईक यांनी धास्ती घेत विविध पावले उचलली आहे. कोरोनाच्या याच दहशतीचा फटका    प च्या ऐवजी ज ऐकल्यामुळे आकुर्डी खंडोबामाळ येथील 'ऐश्वर्यम ' सोसायटीमधील रहिवाशांना बसला.

त्याचे झाले असे की, मंगळवारी सोसायटीमधील एका रहिवाशाने सुरक्षारक्षकाला सांगितले की, आमच्याकडे उद्या परभणीवरून नातेवाईक येणार आहेत. त्यांना सोसायटीच्या आतमध्ये सोडा. मात्र, त्याने परभणीऐवजी जर्मनी ऐकले. आणि सुरू झाला गोंधळ. ‘सी’ विंगमध्ये जर्मनीवरून काही पाहुणे येणार आहेत. ही बातमी सोसायटीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांची झोपच उडाली अन् संबंधित नातेवाइकाला सोसायटीत प्रवेश करू न देण्याचा चंग सोसायटीधारकांनी बांधला. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाची लागण होते, याचा धसका पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला आहे. त्यामुळे जर्मनीवरून काही नातेवाईक आपल्या सोसायटीमध्ये येणार असल्याची चर्चा मंगळवारी सुरू झाली. त्यानंतर बुधवारी सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी नगरसेवक, अधिकारी व विविध हेल्पलाइन क्रमांकांवर वारंवार फोन करून माहिती दिली. सोसायटीमधील रहिवाशी तर नगरसेवकांकडे जाऊन या लोकांना सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये. यासाठी प्रयत्न करत होते. दुसऱ्या दिवशी जर्मनीवरून येणारे पाहुणे सोसायटीमध्ये आले आहेत, हे समजल्यावर सोसायटीमधील इतर सदस्यांनी त्या रहिवाशांचे घर गाठले आणि त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. कोरोनाची लागण सर्वत्र होत असताना तुम्ही जर्मनीवरून पाहुण्याला कशासाठी बोलविले. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला तर जबाबदार कोण, तुम्ही नातेवाइकांना हॉस्पिटलला दाखल करा; अन्यथा पोलिसांकडे तक्रार करू, अशा विविध प्रश्नांचा भडीमार सोसायटीधारकांनी संबंधित सभासदावर केला होता..........नातेवाईक आलेल्या सभासदांचे कोणीही ऐकण्यास तयार होईनात. अहो, दोन मिनिटे ऐका, अशी विनवणी त्यांनी हात जोडून केली. आणि म्हणाले, ‘‘आमचे नातेवाईक हे ‘ज’र्मनीवरून आलेले नसून ‘प’रभणीवरून आले आहेत.’’ हे सांगताना मात्र सोसायटीतील रहिवाशी असलेल्या सभासदाला नाकी नऊ आले. शेवटी जगात जर्मनी व भारतात परभणी याचा अनुभव आला, असे सोसायटीच्या रहिवासी व नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी दिली 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाGermanyजर्मनी