शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 22:12 IST

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५४८ असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू

पुणे : शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़  आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ८८४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़६७ टक्के इतकी आढळून आली आहे़ 

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५४८ असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आह़े़  यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ७९ टक्के इतका आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२२ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३२८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ५० हजार १६४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८६ हजार ७८१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७४ हजार ७८१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्पर्धा परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेकरिता पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याकरिता आज (बुधवार दि़ २८) मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात सकाळी १० ते ५ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. 

युपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार युपीएससीची पूर्व परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थी दिल्लीला जाणार असल्याने त्यांची तेथे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. यासाठी महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात बुधवारी सकाळी १०.०० ते सांयकाळी ०५.०० या वेळेत लसीकरण मोहीम घेतली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.दरम्यान, आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असून, सहा दवाखान्यांमध्ये हे लसीकरण होणार आहे. शासनाकडून आज कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्याने, आज महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका