शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण, साकोरे या गावात सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:34 IST

कोरोनाने शिरकाव केल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्देसाकोरे गावच्या सीमा सील, बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंध

मंचर: आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण साकोरे या गावात सापडला आहे .मुंबईवरून आलेल्या एका 38 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे .प्रशासनाने गावात धाव घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करत गावच्या सीमा सील केल्या आहे. सदर व्यक्ती राहत असलेल्या घरातील 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे .आंबेगाव तालुक्याने मागील दीड महिन्यापासून कोरोनाविरुद्ध चांगला लढा देत कोरोनाला रोखले होते .मात्र आता कोरोनाचा शिरकाव तालुक्यात झाला आहे. मुंबई येथून मोठ्या संख्येने नागरिक तालुक्यात येत आहेत. त्यांच्या मार्फतच कोरोना तालुक्यात पोहचला आहे. शुक्रवारी (दि १५) साकोरे गावात मुंबईवरून पती-पत्नी आले होते. सदर  पुरुषाचा मेहुना कोरोना पॉझिटिव आला होता. त्याच्या संपर्कात हा पुरुष आला होता. साकोरे गावात आल्यानंतर गावाच्या बाहेर असलेल्या वस्तीवर त्यांनी स्वतःला कोरोनटाईन केले होते. यातील 38 वर्षीय पुरुषाला लक्षणे दिसू लागली. प्रशासनाला ही माहिती समजताच त्यांनी शनिवारी पती-पत्नीला तपासणीसाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवले .रात्री या दोघांचे तपासणी अहवाल मिळाले असून 38 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह निघाला आहे .त्याची पत्नी निगेटिव निघाली आहे .या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.प्रांत जितेंद्र डूडी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे ,तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे आदींनी साकोरे गावात जाऊन पाहणी केली आहे .प्रशासनाने साकोरे गावच्या सीमा सील केल्या आहेत. गावात बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे .एक किलोमीटर पर्यंतचा परिसर सील केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सदरची व्यक्ती मुंबईवरून आल्यानंतर गावाच्या बाहेर राहण्यास होतीे. तिचा संपर्क इतरांशी फारसा आला नसला तरी घरातील 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोरोणाचा फैलाव होत असताना त्याला आंबेगाव तालुका अपवाद ठरला होता .मात्र आता कोरोनाने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे.मुंबईवरून येणारे नागरिक सर्रास कुठेही फिरताना आढळत आहे .त्यांना प्रशासनाने कोरोनटाईन करावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

................ साकोरे गावात आम्ही यापूर्वी काटेकोरपणे कोरोणा येऊ नये म्हणून काळजी घेतली होती. मुंबईवरून आलेल्या व्यक्तीमुळे कोरोना गावात आला.सध्या गावात फवारणीचे काम हाती घेतले आहे .शिक्षक घरोघर जाऊन सर्वे करत आहेत. वैद्यकीय तपासणी सुरू आहे. सदर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील दहा जणांची कोरोनाची टेस्ट करण्यात यावी.विनोद मोढवे, सरपंच साकोरे

टॅग्स :ambegaonआंबेगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई