पुणे : शहरात गुरूवारी झालेल्या ४ हजार ९३२ जणांच्या तपासणीत, तर बुधवारच्या साडेपाच हजार तपासणीपैकी आज प्राप्त झालेल्या अहवालात गुरूवारी एकूण ७९५ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे़ तर आज दिवसभरात ८०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची होणारी वाढ गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र असून, गेल्या पाच दिवसात मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. कोरोनाबाधितांचा मृत्यूचा आकडा काही दिवसांपासून दररोज साधारणत: ५० च्या पुढेच होता. मात्र तोही आता ५० च्या आत आला असून, एकूण मृत्यूमध्ये पुण्याबाहेरील व्यक्तींचाही समावेश आहे. आज दिवभरात ३८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील रूग्ण होते. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ८५९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४९६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ७७१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५२ हजार २०० झाली असून, यापैकी अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ३२ इतकी आहे. आजपर्यंत १ लाख ३४ हजार ४०५ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर ३ हजार ७६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. शहरात आजपर्यंत स्वॅब व अँटिजेन व्दारे ६ लाख ६४ हजार १४३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. -----------------------------------
Corona virus : पुणे शहरात दिवसभरात ७९८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण ; ८०५ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:06 IST
गुरुवारपर्यंत १ लाख ३४ हजार ४०५ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.
Corona virus : पुणे शहरात दिवसभरात ७९८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण ; ८०५ जणांची कोरोनावर मात
ठळक मुद्देगुरूवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ८५९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५२ हजार २०० ; अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ३२